राजा मनाचा अक्षय कुमार, अयोध्येतील वानरांसाठी घेतला अत्यंत कौतुकास्पद निर्णय, तुम्हीही कराल कौतुक!

Last Updated:

akshay kumar news - अक्षय कुमारने हे योगदान आपले आई-वडील आणि सासरे यांच्या नावावर दिले आहे. त्याच्या या निर्णयामुळे अक्षय कुमारचे मानवता आणि निसर्गावरील प्रेम दिसून येत आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : बॉलिवुडमधील दिग्गज अभिनेता अक्षय कुमार विविध कारणांमुळे चर्चेत असतो. आता एक पुन्हा तो चर्चेत आला आहे. अक्षय कुमारने राम मंदिराच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांची देणगी दिली होती. यानंतर आता पुन्हा एकदा अक्षय कुमारचे अयोध्येवरील प्रेम दिसून आले आहे. अक्षय कुमारने अयोध्येत वानरांच्या देखभालीसाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला असून, त्याचे देश-विदेशात कौतुक होत आहे.
advertisement
अक्षय कुमारचा हा निर्णय काय -
अक्षय कुमारने अयोध्येतील वानरांच्या देखभालीसाठी अंजनेया सेवा ट्रस्टला दरवर्षी 1 कोटी रुपये देण्याचे वचन दिले आहे. हा ट्रस्ट अयोध्येतील माकडांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी काम करेल. या उपक्रमांतर्गत ट्रस्टतर्फे वानरांना केळी, हरभरा, गूळ खाऊ घातला जाणार आहे.
advertisement
कुणाच्या नावे दिले दान -
अक्षय कुमारने हे योगदान आपले आई-वडील आणि सासरे यांच्या नावावर दिले आहे. त्याच्या या निर्णयामुळे अक्षय कुमारचे मानवता आणि निसर्गावरील प्रेम दिसून येत आहे. तर अयोध्येतील संत-महंतही या ट्रस्टशी संबंधित आहेत. अक्षय कुमारच्या या निर्णयाची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे कौतुक केले आहे. तर यासोबतच अयोध्येतील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
advertisement
अंजनेया सेवा ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी आणि रामलला देवस्थानचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राघवाचार्य यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली. अक्षय कुमारचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, ही मदत समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे. देणगीतून मिळालेल्या पैशाचा उपयोग वानरांना पौष्टिक आहार आणि वैद्यकीय सुविधा देण्यासाठी केला जाईल. अक्षय कुमारचा हा उपक्रम केवळ अयोध्येसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
राजा मनाचा अक्षय कुमार, अयोध्येतील वानरांसाठी घेतला अत्यंत कौतुकास्पद निर्णय, तुम्हीही कराल कौतुक!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement