Tharala Tar Mag: अर्जुन-सायलीच्या आयुष्यात अखेर सुखद वळण, मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दिली गोड बातमी!

Last Updated:

दोघांचा अभिनय आणि मैत्री ही स्क्रीनवर व्यवस्थितपणे जुळून येते. लोकल 18 च्या प्रतिनिधीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने सायली आणि अर्जुन यांच्याशी सवांद साधला.

+
जाणून

जाणून घ्या सायली अर्जुनचे संक्रांत सेलेब्रेशन

निकिता तिवारी
मुंबई : ठरलं तर मग या मालिकेमुळे सध्याच्या घडीला सायली आणि अर्जुन ही सर्वांची आवडती जोडी आहे. सायली आणि अर्जुन ही जोडी त्यांच्या ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीमुळे सर्वच प्रेक्षकांना मनापासून भावते. दोघांचा अभिनय आणि मैत्री ही स्क्रीनवर व्यवस्थितपणे जुळून येते. लोकल 18 च्या प्रतिनिधीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने सायली आणि अर्जुन यांच्याशी सवांद साधला.
advertisement
ठरलं तर मग मालिकेमधील सर्वांची लाडकी सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी ही तिच्या बालपणीच्या आठवणी उलगडताना म्हणाली की, मकर संक्रांतीच्या सणाला आम्ही सर्वजण छान अष्टरची फुले घालून सर्वांना तिळगुळ देण्यासाठी घरोघरी जात असतं. तसेच आम्हाला वेगवेगळ्या वस्तू देखील भेट मिळत असे. तर सर्वांचा लाडका अर्जुन म्हणजे अमित भानुषाली म्हणाला, की मी जरी गुजराती असलो तरी मी सर्व मराठी सण आवडीने साजरी करतो आणि आमच्या शेजारचे सर्व जण हे मराठी असल्यामुळे आम्ही सगळेजण मराठी सणांना जास्त उत्साही असतो.
advertisement
जुईला तिच्या लग्नाबद्दल विचारल्यावर ती म्हणाली की सेटवर सर्वात जास्त माझ्यासाठी मुलगा शोधण्याचे प्रयत्न अमित घेतो आहे. कारण त्याला असं सतत वाटतं की माझं लग्न व्हावं त्यामुळे तो बरेच प्रयत्न घेत आहे. तर अमित म्हणाला की मी सायलीसाठी एक दिवस खूप मोठा हॉल बुक करून स्वयंवर रचणार आहे. सायली म्हणाली की, मला असा जोडीदार हवा आहे जो मला नेहमी व्यवस्थित सांभाळू शकेल. त्याच्याकडे मला माझा कम्फर्ट झोन शोधता येईल आणि चंद्र तारे तोडणारा नको पण माझ्यासारखा डॅशिंग असला पाहिजे. मालिकेत सध्याचे चढउतार सुरू आहे त्याला घेऊन जुई म्हणाली की, मालिकेत लवकरच एक छान वळण येणार आहे आणि ते वळण सर्वच प्रेक्षकांना आवडेल.  सायली अर्जुन समोर तिच्या प्रेमाची कबुली देणार असून लवकरच त्या दोघांमध्ये प्रेमाचे वारे वाहताना तुम्हाला दिसणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Tharala Tar Mag: अर्जुन-सायलीच्या आयुष्यात अखेर सुखद वळण, मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दिली गोड बातमी!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement