IND VS PAK: रवीना टंडनच्या 'मिसाइल'ने पाकिस्तानात खळबळ, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची उडवलेली झोप

Last Updated:

IND VS PAk WAR: भारत पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा भारताने अभिनेत्री रवीना टंडनच्या नावाचे 'मिसाईल' पाकिस्तानला पाठवले होते.

रवीना टंडनच्या 'मिसाइल'ने पाकिस्तानात खळबळ
रवीना टंडनच्या 'मिसाइल'ने पाकिस्तानात खळबळ
मुंबई : सध्या जगभरात भारत विरुद्ध पाकिस्तान हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर मिशनमार्फत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उडवली. काल पाकिस्तानने भारतावर हल्ला चढवला. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे पाकिस्तानने भारताच्या 15 मोठ्या शहरांना लक्ष्य करून तणाव वाढवण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सुरक्षा दलांनी त्यांच्या या नापाक मनसुब्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारत पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा भारताने अभिनेत्री रवीना टंडनच्या नावाचे 'मिसाईल' पाकिस्तानला पाठवले होते.
90 च्या दशकात अभिनेत्री रवीना टंडनचा मोठा चाहता वर्ग होता. यामध्ये पाकिस्तानही मागे नव्हता. त्या काळात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ देखील रवीनाचे चाहते होते. एका मुलाखतीत नवाज शरीफ यांनी उघडपणे कबूल केले होते की रवीना टंडन त्यांची आवडती अभिनेत्री आहे. हे विधान करताच चर्चेची लाट उसळली होती. त्याच वर्षी कारगिल युद्ध पेटले आणि भारताने पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी एक अनोखा, पण मिशकील मार्ग निवडला.
advertisement
कारगिल युद्धादरम्यान, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दिशेने काही क्षेपणास्त्रे पाठवली. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्रांवर लिहिले होते, "रवीना टंडनकडून नवाज शरीफसाठी". या संदेशासोबत एक हृदयाचे चिन्ह देखील रंगवण्यात आले होते. हा फोटो जेव्हा समोर आला, तेव्हा देशभरातून हास्याच्या लाटा उसळल्या आणि भारतीय सैन्याच्या मिशकील पण ठाम उत्तराचे सर्वांनी कौतुक केले.
advertisement
advertisement
दरम्यान, रवीना टंडनने देखील या घटनेवर हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, “जर देशाच्या रक्षणासाठी मला सीमेवर उभे रहावे लागले, तर मी गर्वाने आणि आदराने जाईन.” सध्या भारत विरुद्ध पाक वॉर पेटले असताना या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
IND VS PAK: रवीना टंडनच्या 'मिसाइल'ने पाकिस्तानात खळबळ, माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची उडवलेली झोप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement