'तुझ्या घरी झालं असतं तर?' पंकज धीर यांची शोकसभा, पापाराझींवर भडकले जॅकी श्रॉफ, VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेते पंकज धीर यांच्या प्रेयर मीटला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी जॅकी श्रॉफ पापाराझींवर चांगलेच भडकले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
महाभारतातील कर्ण म्हणजेच अभिनेते पंकज धीर यांचं 15 ऑक्टोबर रोजी निधन झालं. 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 17 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रेयर मीट आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात दु:खी होतं. प्रत्येकाच्या डोळ्यात पंकज धीर यांच्या आठवणी दाटून आल्या होत्या.
या प्रेयर मीटला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्यात जॅकी श्रॉफ, रोहित शेट्टी, सुरेश ओबेरॉय, ईशा देओल, जायद खान, तन्वी आजमी, मोहित रैना आणि मुकेश ऋषी हे कलाकार उपस्थित होते.
तसेच, कॉमेडियन जॉनी लीवर, अभिनेता रंजीत, आदित्य पंचोली, राजत बेदी आणि निर्माता रमेश तौरानी देखील उपस्थित होते. सर्वांनी पंकज धीर यांच्या कुटुंबीयांना धीर दिला आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या आठवणी शेअर केल्या.
advertisement
प्रेयर मीटदरम्यान अभिनेते जॅकी श्रॉफ अत्यंत भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्याच वेळी ती समोर असलेल्या पापाराझींवर चांगलेच भडकले. त्यांनी तिथल्या तिथे कठोर शब्दांत त्यांना सुनावलं.
प्रेयर मीटला पापाराझी आले होते. दु:खात असलेल्या जॅकी श्रॉफचे फोटो काढण्यासाठी ते त्यांच्या जवळ जाऊ लागले. तेव्हा जॅकी श्राफ यांनी त्यांनी खडसावलं. ते म्हणाले, "भिडू मैं कुछ नहीं कर रहा. तू समझदार है ना? तेरे घर में अपने घर में होगा तो? समझ रहा है ना?" जॅकी श्रॉफ यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. जॅकी यांच्या वागण्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे. त्यांनी योग्य वेळी योग्य मत मांडलं यासाठी त्यांचं कौतुक होतंय.
advertisement
advertisement
'महाभारत'मुळे मिळाली ओळख
बी.आर. चोप्रा यांच्या 'महाभारत' मालिकेमधील कर्ण या भूमिकेमुळे पंकज धीर हे लोकप्रिय झाले. त्यांच्या दमदार आवाजाने आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं. टीव्ही विश्वात त्यांनी 'चंद्रकांता', 'बढ़ो बहू', आणि 'ससुराल सिमर का' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.
advertisement
त्याचबरोबर त्यांनी 'बादशाह', 'सोल्जर' आणि 'जमीन'Xसारख्या फिल्म्समध्ये त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली.
सेटवर ते नेहमी शांत, प्रोफेशनल आणि विनम्र स्वभावामुळे ते ओळखले जायचे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 18, 2025 12:35 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुझ्या घरी झालं असतं तर?' पंकज धीर यांची शोकसभा, पापाराझींवर भडकले जॅकी श्रॉफ, VIDEO