Pune Cyber crime: 'अतिरेक्यांना पैसे पुरवले...चौकशीचे आदेश' NIA चीफ असल्याचं सांगून पुण्यात 14500000 रुपयांना गंडा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पुण्यात बनावट राष्ट्रीय तपास यंत्रणेचा चीफ असल्याचे सांगून ७० वर्षीय नागरिकाची १ कोटी ४५ लाखांची डिजिटल अरेस्ट फसवणूक झाली; सायबर पोलिसांकडून तपास सुरू.
अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे: शहरात सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची पातळी किती गाठली आहे, याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पुणे शहरात 'डिजिटल अरेस्ट'च्या फसवणुकीचा एका भयंकर प्रकारात, बनावट राष्ट्रीय तपास यंत्रणेचा चीफ असल्याची बतावणी करत एका 70 वर्षीय नागरिकाची तब्बल 1 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या धोक्यावर गंभीर चिंता व्यक्त होत आहे. डिजिटल अरेस्टची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. पुढचा नंबर तुमचाही असू शकतो, त्यामुळे अलर्ट राहा सावध राहा आणि या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं त्याने काय चूक केली जी तुम्हाला करायची नाही ते लक्षात ठेवा.
काय आहे 'डिजिटल अरेस्ट'ची मोडस ऑपरेंडी?
सायबर गुन्हेगारांनी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने फिर्यादीला जाळ्यात ओढले. त्यांनी स्वतःला राष्ट्रीय तपास यंत्रणेचा प्रमुख असल्याचे भासवत या ७० वर्षीय वृद्धाशी संपर्क साधला. फसवणूक करणाऱ्यांनी फिर्यादीला सांगितले की, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांशी त्यांचा संबंध आहे. फसवणूक करणाऱ्यांनी फिर्यादीला धमकावले की, पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांना त्यांनीच पैसे पुरवले आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून अतिरेक्यांना पैसे पुरवल्याची खोटी माहिती देत, त्याबद्दल फिर्यादीला भासवण्यात आले.
advertisement
पोलीस चौकशीची भीती दाखवून फसवणूक
या बनावट अधिकाऱ्यांनी या ७० वर्षीय नागरिकाला त्वरित पोलीस चौकशीची धमकी दिली. 'तुम्ही दहशतवाद्यांच्या संपर्कात आहात त्यांना आर्थिक मदत केली त्यामुळे तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल,' असे सांगून त्यांना मानसिक दडपण आणलं. या धमकीमुळे घाबरलेल्या फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवला. चौकशीच्या बहाण्याने आणि कारवाई टाळण्याच्या नावाखाली, आरोपींनी फिर्यादीला त्यांचे सगळे बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक गोपनीय माहिती जाणून घेतली. त्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्यांच्या खात्यातून 1 कोटी 45 लाख रुपये काढून घेतले. फिर्यादीला पैसे गमावल्याचे लक्षात आल्यावर त्यांना धक्का बसला आणि त्यांनी त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधला.
advertisement
पुणे सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल
या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पुणे सायबर पोलीस करत आहेत. अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या फसवणूक करणाऱ्या टोळीचा आणि त्यांनी वापरलेल्या बँक खात्यांचा शोध सुरू केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आर्थिक फसवणूक आणि त्यासाठी वापरलेली 'डिजिटल अरेस्ट' सारखी नवी पद्धत पाहता, सायबर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
advertisement
ज्येष्ठ नागरिकांनी सावधानता बाळगावी
view commentsया घटनेने ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कोणत्याही अज्ञात व्यक्तीने सरकारी अधिकारी, पोलीस किंवा तपास यंत्रणेचे नाव वापरून संपर्क साधल्यास, किंवा तत्काळ कारवाईची/अटकेची धमकी देऊन पैसे किंवा बँक तपशील मागितल्यास, त्वरित घाबरून जाऊ नये. अशा प्रकारच्या कॉलला प्रतिसाद देण्याऐवजी, तातडीने सायबर पोलीस स्टेशनमध्ये किंवा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून माहितीची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 18, 2025 12:09 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Cyber crime: 'अतिरेक्यांना पैसे पुरवले...चौकशीचे आदेश' NIA चीफ असल्याचं सांगून पुण्यात 14500000 रुपयांना गंडा