मुंबईसह लगतच्या 2 शहरांत घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता? 'त्या' निर्णयामुळे सर्वसामान्यांचे घर स्वप्न साकारणार

Last Updated:

Ambernath Badlapur Home Prices : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात घर खरेदी करण्याचा विचार करताय तर ही बातमी तुमच्यासाठी. या दोन शहरात घरांच्या किंमती नेमक्या वाढल्या आहेत का कमी झाल्या आहेत ते एकदा जाणून घ्या.

News18
News18
गेल्या काही दिवसांपूर्वी बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांवर जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिमेंटसह इतर महत्वाच्या बांधकाम साहित्यांवरील जीएसटीचे प्रमाण 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यावर आणले गेले आहे. यामुळे बांधकाम खर्चात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि या बदलामुळे भविष्यात घरांच्या किमती कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.
अंबरनाथ आणि बदलापुरातील सध्या घरांच्या किमतीत काही विशेष बदल झालेला नाही. याचा मुख्य कारण म्हणजे आधीच ज्या दरात घरे बांधण्यात आली आहेत, त्यात आधीच उच्च किमतीच्या साहित्याचा समावेश आहे. अशा घरांची विक्री अजूनही त्या मूळ किमतीवर होत आहे, त्यामुळे ग्राहकांसाठी कोणताही तात्काळ फायदा दिसत नाही.
सिमेंटसह अन्य साहित्यावरील जीएसटी घट झाल्यामुळे नवीन प्रकल्पांमध्ये बांधकाम खर्च थोडासा कमी होईल. म्हणजेच भविष्यात बांधकाम सुरू होणारी घरे तुलनेने स्वस्त दरात विकली जाऊ शकतात. परंतु, यासाठी काही वेळ लागेल कारण बाजारात आधीपासून तयार झालेली घरे जुने दरात विकली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांनी घर खरेदी करण्याआधी या बदलांचा थोडा काळ थांबून विचार करणे फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
वास्तविक घरांच्या किमतीवर परिणाम होण्याची प्रक्रिया थोडी हळूगतीनेच होते. जीएसटी घट होणे हा एक सकारात्मक संकेत आहे, पण घरांच्या किमती कमी होण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे आहेत. यामध्ये बांधकाम साहित्याचा मागणी-पुरवठा, भूखंड किमती, वित्तीय दर आणि आर्थिक परिस्थिती यांचा मोठा वाटा असतो. अंबरनाथ आणि बदलापुरासारख्या उपनगरांमध्ये सध्या घरांची मागणी स्थिर असल्याने किंमतीत मोठा फरक दिसत नाही.
advertisement
तथापि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पुढील काही महिन्यांत नव्या प्रकल्पांमध्ये घरांच्या किमती थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतात. त्यामुळे घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांनी बाजाराची हालचाल बारकाईने पाहणे आवश्यक आहे. सध्या ग्राहकांना प्रत्यक्षात कोणताही तात्काळ फायदा मिळणार नाही, पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा निर्णय घर खरेदीसाठी सकारात्मक ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
मुंबईसह लगतच्या 2 शहरांत घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता? 'त्या' निर्णयामुळे सर्वसामान्यांचे घर स्वप्न साकारणार
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement