Jahnavi Killekar : जान्हवीचे पहिले पाढे 55? नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मारला डोक्याला हात
- Published by:Minal Gurav
Last Updated:
जेलमधून बाहेर आल्यानंतर जान्हवीच्या स्वभावात बदल पहायला मिळत होता. मात्र जान्हवीचे पुन्हा पहिले पाढे 55 झाल्याचं पाहायला मिळत आहेत, असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. नेमकं जान्हवीने केलं काय?
मुंबई : मराठी बिग बॉसच्या पहिल्या आठवड्यापासून निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांनी घरात धिंगाणा घातला. या दोघींच्या धिंगाण्यात जान्हवी किल्लेकरला प्रेक्षकांनी चांगलाच धक्का दिला. जान्हवीला तिच्या वागण्यावरून प्रेक्षकांनी चांगलंच ट्रोल केलं. वर्षा उसगावकर आणि पंढरीनाथ कांबळे यांचा अपमान केल्यानं, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने जान्हवी यांना बिग बॉसने जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. जेलमधून बाहेर आल्यानंतर जान्हवीच्या स्वभावात बदल पाहायला मिळत होता. मात्र जान्हवीचे पुन्हा पहिले पाढे ५५ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
यावेळी जान्हवी घरातील मोठ्यांशी नाही तर छोट्या पुढारीशी भांडताना दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सहाव्या आठवड्याचा नॉमिनेशन टास्क पार पडला. त्यानंतर नॉमिनेट झालेल्या सदस्यांनी नॉमिनेट करणाऱ्या सदस्यांवर चांगलाच राग काढला. जान्हवी आणि घन:श्याम यांच्यात चांगलाच वाद झाला आणि त्या वादाने टोक गाठलं.
advertisement
बिग बॉसचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात जान्हवी आणि घन:श्याम कचाकचा भांडताना दिसत आहेत. जान्हवी घन:श्यामला म्हणते, "सगळ्यांना माहिती आहे तुला अक्कल नाही. अख्या घराने तुला नॉमिनेट केलं आहे." यावर घन:श्याम म्हणतो, "मला फरक पडत नाही. तू जेलमध्ये राहून आली आहेस. तुला अक्कल नाही". पुढे घन:श्यामला फटकारत जान्हवी म्हणते, "अक्कल शून्य आहेस तू".
advertisement
View this post on Instagram
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)
घन:श्यामबरोबर भांडताना पुन्हा एकदा जान्हवीचा पहिला अवतार पाहायला मिळाला. जान्हवीची बोलण्याची आणि भांडण्याची भाषा पाहून पुन्हा एकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे. जान्हवीचे पहिले पाढे पंचावन्न आहेत अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.
एका युजरनं लिहिलंय, "जान्हवी फुटेज घेते गरीब घनश्याम वर ओरडून, निक्कीशी भिडू नाही शकत". दुसऱ्या युजरनं लिहिलंय, "जान्हवी स्वतःच्या मुलावर डोळे फाडून असे ओरडेल का..??". आणखी एका युजरनं लिहिलंय, "अरे जान्हवी मॅडम परत आल्या जागेवर, ती जेलमध्येच बरी होती".
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 03, 2024 2:35 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Jahnavi Killekar : जान्हवीचे पहिले पाढे 55? नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मारला डोक्याला हात





