'नव्याने कधीच लग्न करू नये...' अमिताबसोबत 52 वर्षांचा संसार, पण जया बच्चन यांचा नातीला असा सल्ला का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
जया बच्चन यांनी अमिताभ यांच्याबरोबर तब्बल 52 वर्षांचा संसार केला, पण आज त्यांच्या नातीने लग्न करू नये असं त्या म्हणाल्या. 28 वर्षांच्या नव्याला जया बच्चन यांनी का दिला लग्न न करण्याचा सल्ला?
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. जया बच्चन यांच्याशी विवाहित असूनही अमिताभ बच्चन यांचं नाव रेखाशी जोडलं गेलं. अमिताभ आणि रेखा यांच्या प्रेमसंबंधाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. या सगळ्यावर अमिताभ बच्चन किंवा जया यांनी कधीच उघडपणे भाष्य केलं नाही. अमिताभ आणि जया बच्चन यांचा तब्बल 52 वर्षांचा संसार आहे. इतके वर्ष संसार केल्यानंतर जया बच्चन यांनी अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान त्यांचा लग्नसंस्थेवरील विश्वास उडाल्याचं सांगितलं. मी कधीच माझी नात नव्या नवेदी नंदाला लग्न करण्याचा सल्ला देणार नाही असं त्या स्पष्टच म्हणाल्या.
जया बच्चन यांनी नुकतीच 'वी द वुमन' कार्यक्रमात उपस्थित लावली होती. या कार्यक्रमात बोलताना जया बच्चन म्हणाल्या, लग्न आता भूतकाळातील गोष्ट आहे आणि त्यांनी सहजपणे संकेत दिला की त्यांचा त्यावर विश्वास उडाला आहे. नात नव्या नवेली नंदा हिने कधीही लग्न करू नये असे वाटते. लग्न म्हणजे नातेसंबंधांची व्याख्या नाही, असंही जया बच्चन म्हणाल्या.
advertisement
जया बच्चन पुढे म्हणाल्या, "मला नव्याने लग्न करावे असे वाटत नाही." लग्न ही भूतकाळातील गोष्ट आहे असे तिला वाटते का असे विचारले असता, जया सहमत झाल्या आणि म्हणाल्या, "हो, नक्कीच. मी आता आजी आहे. नव्या काही दिवसांत 28 वर्षांची होईल. मी आता इतकी म्हातारी झाली आहे की मी आजच्या मुलींना लग्नाबाबत कोणताही सल्ला देऊ शकत नाही. खूप काही बदलले आहे आणि आजची लहान मुले इतकी हुशार आहेत की ती तुम्हाला मागे टाकू शकतात."
advertisement
Jaya Bachchan says “I don’t want my granddaughter Navya to get married. Marriage is an outdated concept"
Your views? pic.twitter.com/ZkfTMSuu8C https://t.co/IpCe555WUT
— News Algebra (@NewsAlgebraIND) November 30, 2025
लग्न म्हणजे लड्डू- जया बच्चन
जया बच्चन यांनी लग्नाचं लड्डू असं वर्णन केलं आहे. शादीचा लाडू खाणं कठीण होतं आणि खाल्ला नाही तर पश्चातापही होतो. आजची लहान मुलं वृद्धांपेक्षा जास्त हुशार आहेत आणि ते स्वतःचं चांगले-वाईट चांगल्या प्रकारे समजू शकतात, असंही जया बच्चन म्हणाल्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 9:06 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'नव्याने कधीच लग्न करू नये...' अमिताबसोबत 52 वर्षांचा संसार, पण जया बच्चन यांचा नातीला असा सल्ला का?


