आता होणार कोर्ट रुम ड्रामा, अक्षय-अरशदच्या भांडणात अडकला जज, Jolly LLB 3 चा मजेदार ट्रेलर
Last Updated:
Jolly LLB 3 Trailer Out : अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या आगामी 'जॉली एलएलबी 3' या कार्यक्रमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची आता सिनेमाची उत्सुकता आहे.
Jolly LLB 3 Trailer Out : अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या आगामी 'जॉली एलएलबी 3' या कार्यक्रमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची आता सिनेमाची उत्सुकता आहे.
Jolly LLB 3 Trailer : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अरशद वारसी (Arshad Warsi) यांच्या आगामी 'जॉली एलएलबी' (Jolly LLB 3) या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला आहे. अरशद आणि अक्षय आमने-सामने आल्यावर काय धमाका करणार हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. शेतकऱ्यांची भावुक कथा सांगणारा हा चित्रपट असणार आहे. जॉली VS जॉली यांचा कोर्टरुममधील ड्रामा प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन करेल.
advertisement
'जॉली एलएलबी 3'चा ट्रेलरने वेधलं लक्ष
'जॉली एलएलबी 3' या चित्रपटाचं कथानक अत्यंत भावनात्मक आणि सत्य घटनांवर आधारित आहे. पात्रांमध्ये होणारे खटके आणि त्यातून निर्माण होणारा विनोदातून एक रहस्यमय नाट्यनिर्मिती होते. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढताना शेतकऱ्यांची होणारी घुस्मट या चित्रपटात हलक्या-फुलक्या पद्धतीने दाखविली आहे. ट्रेलरची सुरुवात एका अत्यंत दमदार संवादाने होते. हा डायलॉग प्रेक्षकांनाही विचार करायला भाग पाडतो.
advertisement
advertisement
दोन्ही जॉली आमने-सामने
'जॉली एलएलबी 3' या चित्रपटात दोन्ही जॉली आमने-सामने येणार आहे. जॉली नंबर 1 म्हणजेच अरशद वारसी शेतकऱ्यांसाठी लढताना दिसून येईल. तर दुसरा जॉली म्हणजेच अक्षय कुमार पैशांच्या लालचेपोटी एका श्रीमंत माणसाचा आवाज बनलेला दिसून येईल. 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटात एक मोठा ट्विस्ट असणार आहे. ट्रेलरमध्ये याची झलक पाहायला मिळत आहे. दोन्ही जॉलींची न्यायालयात एकाचवेळी बाजू ऐकणं ही न्यायाधीश त्रिपाठी म्हणजेच सौरभ शुक्ला यांची कसोटी असणार आहे.
advertisement
'जॉली एलएलबी 3' कधी रिली होणार?
'जॉली एलएलबी'च्या याआधी प्रदर्शित झालेल्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला होता. त्यामुळे आता तिसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 'जॉली एलएलबी 3' हा चित्रपट येत्या 19 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अरशद वारसी आणि सौरभ शुक्लासह अमृता राव, हुमा कुरैशी, सीमा बिस्वास, गजराज राव आणि राम कपूरसारखे कलाकार झळकणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 10, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आता होणार कोर्ट रुम ड्रामा, अक्षय-अरशदच्या भांडणात अडकला जज, Jolly LLB 3 चा मजेदार ट्रेलर