ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये कंडोमवरून गदारोळ, सोनाक्षीने विचारला असा प्रश्न, हसूनहसून रडवेली झाली काजोल; VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा 'टू मच' नावाचा चॅट शो सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच गाजत आहे. सध्या त्यांच्या शोच्या एका एपिसोडमधील क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.
मुंबई: अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा 'टू मच' नावाचा चॅट शो सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच गाजत आहे. या शोच्या सहाव्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी हजेरी लावली होती. या एपिसोडमधील एका महत्त्वपूर्ण विषयावरील चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ती म्हणजे कंडोम खरेदी करण्याबद्दल भारतीयांची असलेली मानसिकता.
या चॅट शोमध्ये एक असा सेगमेंट आहे, जिथे पाहुण्यांना चर्चा करण्यासाठी एक विषय दिला जातो आणि त्यांना 'सपोर्ट' किंवा 'विरोध' करायचा असतो. यावेळी चर्चेचा विषय होता, 'भारतीय लोकांना फेअरनेस क्रीम खरेदी करण्यापेक्षा कंडोम खरेदी करताना जास्त लाज वाटते.'
भारतीय कसे करतात कंडोमची खरेदी
काजोलने या विषयाला सपोर्ट करत एक मजेदार किस्सा सांगितला. ती म्हणाली, "लोकांना लाज वाटते! फेअरनेस क्रीम खरेदी करायला जा, तर ते सहज म्हणतात, 'ती शाहरुख खानची क्रीम द्या.' पण कंडोम खरेदी करताना लोक अवघडतात आणि लाजतात."
advertisement
advertisement
मनीष मल्होत्रा आणि ट्विंकल खन्ना यांनी मात्र या विषयाला विरोध केला. मनीष म्हणाला, "भारत बदलला आहे आणि आता असे काहीही नाही." या विषयावर वाद रंगलेला असताना, सोनाक्षी सिन्हाने एक असा प्रश्न विचारला, ज्यामुळे काजोललाही हसू आले. मनीष मल्होत्रा जेव्हा 'भारतात आता कोणालाच कंडोम खरेदी करताना भीती वाटत नाही' असे सांगत होते, तेव्हा सोनाक्षीने लगेच विचारले, "मग आपली लोकसंख्या इतकी जास्त का आहे?"
advertisement
सोनाक्षी पुढे म्हणाली, "यावरून हे स्पष्ट होते की, बहुतेक लोक कंडोम खरेदी करत नाहीत!" यावर मनीष मल्होत्रा यांनी सहमती दर्शवली नाही. एकूणच, या एपिसोडमध्ये भारताच्या लैंगिक शिक्षणाबद्दल असलेल्या दोन वेगवेगळ्या मानसिकतेचे दर्शन घडले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये कंडोमवरून गदारोळ, सोनाक्षीने विचारला असा प्रश्न, हसूनहसून रडवेली झाली काजोल; VIDEO


