KGF स्टार यशच्या आईची मोठी फसवणूक, 65 लाखांचा गंडा, काय आहे संपूर्ण प्रकरण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
KGF Star : KGF स्टार यशची आई पुष्पलता यांची 'कोथलावडी' या कन्नड चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रमोटर हरीश अरासू यांनी 64.8 लाखांची फसवणूक केली आहे. आता धमकी आणि नकारात्मकेचा प्रचार केल्याचा आरोप करत त्यांनी FIR दाखल केली आहे.
KGF Yash Mother : KGF स्टार यश नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. पण आता अभिनेता आपल्या आईमुळे चर्चेत आला आहे. यशची आई पुष्पलता यांची मोठी फसवणूक झाली आहे. त्यांना 65 लाखांचा गंडा लागला आहे. 'कोथलावडी' या कन्नड चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रमोटर हरीश अरासू यांनी 64.8 लाखांची फसवणूक केली आहे. आता धमकी आणि नकारात्मकेचा प्रचार केल्याचा आरोप करत त्यांनी FIR दाखल केली आहे. पुष्पलता यांनी निर्मित केलेला 'कोथलावाडी' हा चित्रपट 1 ऑगस्ट 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण आता त्यांना लाखोंचा गंडा कसा काय लागला जाणून घ्या...
काय आहे प्रकरण?
पुष्पलता यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की 'कोथलावाडी' चित्रपटाचे प्रमोशन करण्याची जबाबदारी त्यांनी हरीश अरासू यांना दिली होती. चित्रपटाचे शूटिंग 24 मे 2025 पासून जुलैपर्यंत तलकाडू, गुंडलुपेट, मैसूर आणि चामराजनगर अशा अनेक ठिकाणी झाले. आधी ठरलेल्या करारानुसार हरीश यांनी फक्त 2.3 लाख रुपये प्रमोशनसाठी खर्च करायचे होते. पण आरोपानुसार हरीश यांनी चित्रपटाच्या नावाचा वापर करून विविध ठिकाणांहून आणखी 24 लाख रुपये गोळा केले. पुष्पलता यांनी दावा केला आहे की त्यांनी हरीश यांना एकूण 64,87,700 रुपये दिले. त्यात 31 जुलै रोजी प्रिंट मीडियातील जाहिरातींसाठी दिलेले 4 लाख रुपयही समाविष्ट होते.
advertisement
धमकी व नकारात्मक प्रचाराचे गंभीर आरोप
पुष्पलता यांनी या रकमेबाबत स्पष्टीकरण मागितल्यावर हरीश यांनी त्यांना धमकावले आणि आणखी 27 लाख रुपये मागितले. 1 ऑगस्टला पुष्पलतांना कळले की चित्रपटाचे प्रमोशन करण्याचे साहित्य गायब आहे. त्यानंतर त्यांना हरीश चित्रपट व टीमविषयी नकारात्मक प्रचार करत असल्याची माहिती मिळाली. हरीश यांनी सोशल मीडियावर त्यांच्या बद्दल अपमानास्पद पोस्ट करणे आणि पुष्पा यांच्या घरी येऊन गोंधळ घालण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी पुष्पलता आणि चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराज यांना हरीश, मनू, नितीन आणि इतर काही अज्ञात व्यक्तींनी फोनद्वारे धमकी देण्याचा प्रयत्न केला.
advertisement
पोलिस कारवाईची मागणी
view commentsगंभीर आरोपांनंतर पुष्पलता यांनी हाय ग्राउंड्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी हरीश अरासू, मनू, नितीन, महेश गुरु आणि स्वर्णलता (रणनायक) यांच्याविरुद्ध फसवणूक, धमकी, मानहानी व गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 3:02 PM IST


