Navratri 2025 : नवरात्रीचा आणि नऊ रंगांचा काय संबंध? कुशलला पडला प्रश्न, उत्तर ऐकून विचारात पडाल, VIDEO

Last Updated:

Kushal Badrike Navratri Color Video : नवरात्रीचा आणि नऊ रंगाचा काय संबंध आहे असाच प्रश्न कुशलला देखील पडला. त्यावर विचार केल्यानंतर कुशलला उत्तर सापडलं.

News18
News18
मुंबई : नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. प्रत्येक जण नवरात्री साजरी करत आहेत. अनेक कलाकार मंडळींनी नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता कुशल बद्रिकेनं देखील खास व्हिडीओ शेअर केला आहे. नवरात्रीत नऊ रंगांचा काय संबंध या विषयावर कुशलनं त्याचं मतं मांडलं आहे. त्याचा हा भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
नवरात्री आणि नऊ रंग हा अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आहे. दरवर्षी नऊ दिवस नऊ रंग फॉलो करण्याचा ट्रेंड आहे. नवरात्रीचा आणि नऊ रंगाचा काय संबंध आहे असाच प्रश्न कुशलला देखील पडला. त्यावर विचार केल्यानंतर कुशलला उत्तर सापडलं. त्याने व्हिडीओ शेअर करत ते उत्तर सर्वांबरोबर शेअर केलं आहे.
advertisement
कुशलने व्हिडीओमध्ये म्हटलंय, "नवरात्रीचा आणि नऊ रंगांचा काय संबंध? ह्या विचारात असताना मला अचानक ज्या गोष्टींचा साक्षात्कार झाला ना त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण त्या रंगांचा उपयोग नवरात्रीत होत नाही. तसंच रंग बदलणाऱ्या सरड्यालासुद्धा असतो पण त्याला नवरात्र साजरी करता येत नाही."



 










View this post on Instagram























 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)



advertisement
कुशल पुढे म्हणाला, "होळीत आपण आपल्या अंगाला वेगवेगळे रंग लावतो. तर नवरात्रीत आपण कपड्यांच्या वेगवेगळ्या रंगांना आपलं अंग लावतो. 'रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा' या सुरेश भट्टांच्या गाण्यात ज्या रंगाविषयी बोललं जातंय, तो रंग दाखवण्याचा नसून वैयक्तिक अनुभवण्याचा आहे. त्यामुळे नवरात्रीत त्या रंगांचा उपयोग होत नाही आणि कदाचित म्हणूनच हे गाणं गरब्यात वाजत नाही".
advertisement
कुशलने कृष्ण आणि रासलीलाचा संदर्भ देत म्हटलं, "यूपीमध्ये जन्माला आलेल्या कृष्णाची रासलीला गुजरातमध्ये मानल्या जाणाऱ्या संतोषी मातेपुढे खेळली जाते. महाराष्ट्रात हा उत्सव जोरदार साजरा केला जातो. त्यामुळे या उत्सवाला जाती-पातीचा रंग चढत नाही आणि माणूस म्हणून जगण्याची खरी रंगत येते हे या सणाचं मला वैशिष्ट्य वाटतं. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा"
मराठी बातम्या/मनोरंजन/
Navratri 2025 : नवरात्रीचा आणि नऊ रंगांचा काय संबंध? कुशलला पडला प्रश्न, उत्तर ऐकून विचारात पडाल, VIDEO
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement