Palawa Flyover: कोट्वधींचा खर्च अन् 6 वर्षे काम! रस्ते विकास महामंडळ टिकेचं धनी, काय आहे प्रकरण?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Palawa Flyover: वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी 6 वर्षांचा कालावधी घेऊन हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे.
कल्याण: डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरहून मुंबई आणि नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मोठा गाजावाजा करून पलावा उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. या उड्डाणपुलाची एक लेन 4 जुलै रोजी वाहतुकीसाठी सुरू देखील झाली आहे. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच या पुलावरील रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. सध्या हा रस्ता दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य रस्ते विकास महामंडळ टिकेचं धनी ठरलं आहे. या कामाची रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली पाहिजे, अशा शब्दांत नागरिकांनी रस्ते विकास महामंडळाची खिल्ली उडवली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी सुमारे 250 कोटी रुपयांचा खर्च करून हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. यासाठी 6 वर्षांचा कालावधीही लागला. तरी देखील कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. कल्याण शीळ रोडवरील या पुलाची एक लेन जुलै महिन्यात सुरू केली होती. त्यानंतर काहीच दिवसात पुलावर तोच दुचाकीस्वारांचे अपघात झाल्याने हा पूल लगेच बंद केला गेला होता. रस्त्याचं काम पूर्ण करून दोन दिवसांनी पुन्हा तो वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र, पुन्हा त्यावर खड्डे पडले आहेत.
advertisement
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 18 सप्टेंबर रोजी एका शासकीय कार्यक्रमासाठी आले असता त्यांना देखील खड्यांतून धक्के खात प्रवास केला. डोंबिवली, कल्याणमध्ये नवरात्रौत्सवाची धामधूम असताना राज्यभरातील मान्यवरांना शहरात येतांना अडथळे येऊ नयेत यासाठी पुलाची दुरुस्ती दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत. आता दोन दिवसांपासून पुलावरील डांबरी जाड थर काढून त्यावर अस्फाल्ट टाकण्याचं काम नव्याने सुरू याकामासाठी पुलावरील एक लेन पूर्णपणे बंद केली आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
September 23, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Palawa Flyover: कोट्वधींचा खर्च अन् 6 वर्षे काम! रस्ते विकास महामंडळ टिकेचं धनी, काय आहे प्रकरण?