जयंतला मिळाली रिअल लाईफ जान्हवी! मृणाल दुसानिसच्या ऑनस्क्रिन बहिणीसोबत लगीनघाई
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Meghan Jadhav Wedding : 'लक्ष्मी निवास' मालिकेतील जयंतला त्याची रिअल लाईफ जान्हवी भेटली आहे. अभिनेत्री मृणाल दुसानिसच्या ऑनस्क्रिन बहिणीबरोबर तो लग्न करणार आहे.
मराठी मनोरंजन विश्वात माहीत काही दिवसांत कलाकारांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुले चाहत्यांनाही धक्का बसला होता. अशातच एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकतंच आप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील आप्पीनं साखरपुडा केला. त्यानंतर अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिनं देखील समाधान सरवणकर यांच्याबरोबर साखरपुडा करत आनंदाची बातमी दिली. त्यानंतर आता आणखी एक मराठी अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
'लक्ष्मी निवास' मालिकेतील जयंतला त्याची रिअल लाईफ जान्हवी भेटली आहे. त्याची रिअल लाईफ जान्हवी देखील मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधव 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील मृणाल दुसानिसच्या ऑनस्क्रिन बहिणीशी लग्न करणार आहे. म्हणजेच अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आणि मेघन जाधव एकमेकांना डेट करत असून दोघे लवकरच लग्न करणार आहेत. दोघांचीही लगीन घाई सुरू झाली आहे.
advertisement
मेघनने इन्स्टाग्रामवर अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात त्याने अनुष्काचा हात हातात घेतला आहे. दोघांच्या हातात रिंग दिसत आहे. त्यासोबत हार्ट आणि नजरवाला इमोजी शेअर केला आहे.

advertisement
तर अनुष्काने देखील तिच्या इन्स्टाग्राम दोघांचा क्लोज फोटो शेअर केला आहे. ज्यात मेघनचा चेहरा पूर्ण दिसत नाहीये. तिनेही सेम इमोजी पोस्ट केले आहेत. दोघांनी त्यांच्या पोस्टमध्ये एकमेकांना टॅग केलेलं नाही. पण राजश्री मराठीने त्यांच्या लग्नाबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.

अभिनेता मेघन जाधव सध्या 'लक्ष्मी निवास' मालिकेत काम करतोय. मालिकेत त्याने साकारलेलं जयंत हे कॅरेक्टर प्रेक्षकांना आवडलं आहे. तर अनुष्का 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत काम करतेय. तिने मृणाल दुसानिसच्या ऑनस्क्रिन बहिणीची म्हणजे नंदिनीच्या बहिणीची भुमिका साकारली आहे.  त्याआधी अनुष्का 'रंग माझा वेगळा' मालिकेतही दिसली होती. तिने दीपाच्या मुलीची भूमिका साकारली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 30, 2025 3:36 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जयंतला मिळाली रिअल लाईफ जान्हवी! मृणाल दुसानिसच्या ऑनस्क्रिन बहिणीसोबत लगीनघाई


