हिंदीत डब झाली मराठी फिल्म, 20 वर्षांनी बनला सिक्वेल; लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा हॉरर सिनेमा कोणीच विसरू शकत नाही
- Published by:Minal Gurav
Last Updated:
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक मराठी हॉरर सिनेमा हिंदीच डब करण्यात आला. दोन्ही सिनेमांची नाव भन्नाट आहेत.
मुंबई, 24 ऑक्टोबर : मराठी इंडस्ट्रीला लाभलेला अभिनयाचा हिरा म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. आपल्या अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 26 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. आज ते या जगात नसले तरी त्यांचं काम आजही आपलं मनोरंजन करत असतं. मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांनी केलेला एक हॉरर सिनेमा मराठी सिनेसृष्टीत गाजलाच त्याचप्रमाणे तो हिंदीतही डब करण्यात आला. त्याच सिनेमाचा 20 वर्षांनी मराठीमध्ये सिक्वेल तयार करण्यात आला. आता त्या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टची तयारी सुरी झाली आहे. लक्ष्मीकांत यांच्या जयंती निमित्तानं त्यांच्या सिनेमाचा हा किस्सा पाहूयात.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची 'हम आपके है कौन' या सिनेमातून लल्लू ही भूमिका चांगलीच गाडली. त्यानंतर 'मैने प्यार किया' सारख्या कितीतरी सिनेमात त्यांनी काम केलं. सलमान खानबरोबर त्यांची जोडी चांगलीच जमली होती. दोघांची कमेस्ट्री आणि कॉमेडीचं उत्तम टायमिंग प्रेक्षकांना खूप आवडलं.
advertisement
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 90च्या दशकात आलेला तो हॉरर सिनेमा प्रेक्षक आणि खासकरून लहान मुलं कधीच विसरू शकत नाही. एक भावला जिंवत होतो आणि लक्ष्मीकांत जीव घेण्याचा प्रयत्न करतो अशी या सिनेमाची कथा होती. तो सिनेमा म्हणजे 'झपाटलेला'. महेश कोठारे यांनी आजवर दिग्दर्शित केलेल्या सिनेमांपैकी हा एक उत्तम सिनेमा ठरला. 1993 साली 'झपाटलेला' हा मराठी सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर 1995 साली 'खिलौना बना खलनायक' या नावानं हा सिनेमा हिंदीत डब करण्यात आला. या सिनेमात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर, अभिनेते महेश कोठारे, किशोरी अंबिये, रवींद्र बेर्डे, विजय चव्हाण, दिनकर इनामदार हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.
advertisement
'झपाटलेला' हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील एक कल्ट सिनेमा आहे. या सिनेमाची बरोबर आजवर कोणताही सिनेमा करू शकलेला नाही. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी 20 वर्षांनी मुलगा आदिनाथ कोठारे याला घेऊन 'झपाटलेला 2' हा सिनेमा तयार केला. यात सिनेमातील लक्ष्याचा मुलाची गोष्ट दाखवण्यात आली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2023 4:33 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
हिंदीत डब झाली मराठी फिल्म, 20 वर्षांनी बनला सिक्वेल; लक्ष्मीकांत बेर्डेंचा हा हॉरर सिनेमा कोणीच विसरू शकत नाही