ऐश्वर्या-कतरिना सोडा, 59 वर्षीय सलमान खानचा बॉलिवूडच्या 'मिल्की ब्यूटी'सोबत रोमान्स, फॅन्स म्हणतात 'बेस्ट केमिस्ट्री!'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salman Khan Viral Video : सलमानचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो बॉलिवूडच्या सर्वांत सुंदर अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान इंडस्ट्रीच्या सर्वांत पॉप्यूलर सेलेब्सपैकी एक आहे. ५९व्या वर्षीही त्याची फॅन फॉलोविंग कमी झालेली नाही. आजही लोकांमध्ये त्याची तीच क्रेझ आहे जी 37 वर्षांपूर्वी होती. सलमान त्याच्या चित्रपटांपैक्षाही त्याच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. अशातच त्याच्या लव्ह लाइफबद्दल लोकांना वेगळंच आकर्षण आहे. ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफसोबतचं त्याचं रिलेशनशिप तर सातत्याने चर्चेत राहिलं आहे. पण सलमानचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो बॉलिवूडच्या सर्वांत सुंदर अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या कतारमधील दोहा येथे आयोजित केलेल्या आपल्या बहुचर्चित 'द-बंग टूर' मुळे चर्चेत आहे. यावेळी कतरिना कैफ आणि सोनाक्षी सिन्हा या टूरमध्ये सहभागी झाल्या नाहीत, पण त्यांच्या जागी अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि जॅकलिन फर्नांडिसने सलमानसोबत स्टेजवर आग लावली. या टूरमधील सलमान खानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पण तमन्ना भाटियासोबतच्या एका रोमँटिक डान्स व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
'दिल दिया गल्लां'वर थिरकले सलमान-तमन्ना
१४ नोव्हेंबर रोजी दोहा, कतार येथे झालेल्या 'दबंग टूर'च्या परफॉर्मन्समध्ये सलमान खान आणि तमन्ना भाटिया यांनी एकत्र एक धमाकेदार आणि रोमँटिक परफॉर्मन्स दिला. या दोघांनी 'टायगर जिंदा है' चित्रपटातील लोकप्रिय गाणे 'दिल दिया गल्लां' वर डान्स केला. त्यांच्या या रोमँटिक केमिस्ट्रीने अनेकांना प्रेमात पाडलं. ५९ वर्षांचा असूनही सलमान खान ब्लॅक सूट-बूटमध्ये खूपच हँडसम दिसत होता, तर तमन्ना भाटियाने रेड आउटफिटमध्ये आपल्या सौंदर्याची आणि डान्सची जादू दाखवली.
advertisement
advertisement
चाहत्यांना आवडली नवी जोडी
सलमान आणि तमन्ना यांना एकत्र डान्स करताना पाहून चाहते खूप खुश झाले आहेत आणि त्यांच्या केमिस्ट्रीचे तोंडभरून कौतुक करत आहेत. एका युजरने या जोडीचे कौतुक करत म्हटले, "सलमान आणि तमन्नाची ही बेस्ट जोडी आहे!" तर दुसऱ्या एका चाहत्याने, "त्यांची जोडी खूप चांगली जमली आहे," अशी प्रतिक्रिया दिली.
advertisement
'बिग बॉस' मधून सलमान खानने घेतला ब्रेक
सध्या सलमानने या टूरसाठी बिग बॉसमधून ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या गैरहजेरीत यंदाचा वीकेंडचा वार रोहित शेट्टी होस्ट करताना दिसेल. 'दबंग टूर' संपल्यानंतर सलमान खान पुन्हा एकदा 'बिग बॉस १९' च्या होस्टिंगची खुर्ची सांभाळायला परतणार आहे.
यासोबतच तो लवकरच आपल्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान शहीद कर्नल बी. संतोष बाबू या वास्तविक जीवनातील नायकाची भूमिका साकारणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 4:35 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ऐश्वर्या-कतरिना सोडा, 59 वर्षीय सलमान खानचा बॉलिवूडच्या 'मिल्की ब्यूटी'सोबत रोमान्स, फॅन्स म्हणतात 'बेस्ट केमिस्ट्री!'


