शिफ्टिंगवेळी लोकांना बोलावलं अन् त्यांनीच 'घर साफ' केलं! अंधेरीच्या प्रसिद्ध व्यावसायिकासोबत काय घडलं?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
अंधेरीमध्ये एका व्यावसायिकाच्या घरी सामान शिफ्ट करणाऱ्या कामगारांनी सामानावर डल्ला मारला आहे. त्यांनी बिझनेसमनच्या घरातून लाखोंचा मुद्दामाल लंपास केला आहे. त्यांनी संशयित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत.
अनेकदा आपण घरातले सामानाची शिफ्टिंग करण्यासाठी मुव्हर्स आणि पॅकर्स करणाऱ्या व्यक्तींना बोलावतो. त्यांची आपल्याला घराची शिफ्टिंग करण्यासाठी किंवा घराची साफसफाई करण्यासाठी खूपच मदत होते. पण ह्याच घरामध्ये शिफ्टिंगसाठी बोलावलेल्या या कामगारांनी घरात डल्ला मारला तर? असाच काहीसा प्रकार घडलाय मुंबईतल्या अंधेरीमध्ये.... अंधेरीमध्ये एका व्यावसायिकाच्या घरी मुव्हर्स आणि पॅकर्स करणाऱ्या कामगारांनी डल्ला मारला आहे. त्यांनी बिझनेसमनच्या घरातून लाखोंचा मुद्दामाल लंपास केला आहे. त्यांनी संशयित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत.
अंधेरीतील व्यावसायिक अनंतकमल श्रीवास्तव (वय- 37 वर्षे) यांच्या घरामध्ये मुव्हर्स आणि पॅकर्स करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चोरी केली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांना लाखोंच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे. अंधेरीमध्ये स्थायिक असलेले अनंतकमल श्रीवास्तव यांच्या घराची शिफ्टिंग सुरू होती. घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी त्यांनी एका एजन्सीतील मुव्हिंग आणि पॅकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावलं. त्यातील मूव्हर्स-पॅकर्सच्या कर्मचाऱ्यांनी सामानाच्या शिफ्टींगदरम्यान सोन्या आणि चांदीची नाणी चोरल्याची घटना समोर आली आहे. बिझनेसमन अनंतकमल श्रीवास्तव यांनी अंबोली पोलिसांत घटनेची तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित चोराला ताब्यात घेतले आहेत.
advertisement
अंबोली पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संशयित कर्मचारी अभिषेक तिवारी याच्याविरोधात 13 नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवला. त्याची सध्या पोलिस कसून चौकशी करत असून त्याच्याकडून आणखी काही धागेदोरे प्राप्त होतायत का? याचा ते सध्या शोध घेत आहेत. अंधेरीच्या लाभ समर्थ हाइट्समधून नवीन घरात शिफ्टिंगसाठी त्यांनी युनिटी पॅकर्स अँड मूव्ह नावाच्या कंपनीला काम दिले होते. शिफ्टींगदरम्यान दहा ग्रॅमचे सोने आणि चांदीची प्रत्येकी दोन नाणी गायब असल्याचे आढळले. चोरट्यांनी लाखोंच्या मुद्देमालावर डल्ला मारताच व्यावसायिकांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिस चौकशी करत चोराच्या शोध घेत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 4:35 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
शिफ्टिंगवेळी लोकांना बोलावलं अन् त्यांनीच 'घर साफ' केलं! अंधेरीच्या प्रसिद्ध व्यावसायिकासोबत काय घडलं?


