छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा म्हणजे दुष्काळ आणि कोरडे हवामान, अशा प्रतिमेमुळे इथे केशर शेतीची कल्पनाही करणे कठीण मानले जाते. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या येथील सीए प्रिया अग्रवाल यांनी या अशक्य वाटणाऱ्या संकल्पनेलाच आकार देत एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. जवळपास वर्षभर सातत्याने माहिती गोळा करून, अभ्यास करून आणि विविध तांत्रिक उपाय आजमावत त्यांनी आपल्या घरातील एका छोट्याशा खोलीत केशराची लागवड उभी केली आणि तब्बल 35 ग्रॅम शुद्ध केशरचे उत्पादन घेतले. आता या उपक्रमाला व्यावसायिक रूप देण्याचा त्यांचा संकल्प असल्याचे प्रिया अग्रवाल यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
Last Updated: November 15, 2025, 16:25 IST