Lok Sabha Election 2024 Result : कंगना रणौत होणार का पहिल्यांदाच खासदार? जनता देणार का साथ?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कंगना ज्या ठिकाणाहून खासदारकिसाठी उभी आहे तिथून ती निवडून येईल अशी पक्की खात्री तिला आहे. अनेकदा तिनं मी जिंकणारच असं म्हटलं आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये काम करत असताना आपल्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत कायम चर्चेत राहिली. कंगना राजकारणात सक्रीय होईल याची शक्यता नेहमीच होती. अखेर कंगनानं भाजपचं कमळ हाती घेत 2024च्या लोकसभा निवडणूकांच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. आपल्या होम पीचवरुन म्हणजेच हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून कंगना खासदारकीसाठी उभी राहिली आहे. लोकसभा निवडणूकांच्या शेवटच्या टप्प्यात मंडी येथील मतदान पार पडलं.
कंगना ज्या ठिकाणाहून खासदारकिसाठी उभी आहे तिथून ती निवडून येईल अशी पक्की खात्री तिला आहे. अनेकदा तिनं मी जिंकणारच असं म्हटलं आहे. हिमाचल प्रदेश हे राज्य तसं छोटं आहे पण इथे यंदा भाजपचं कमळ उगवण्याची शक्यता आहे. राज्याला लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 4 जागा देण्यात आल्या. चारही जागा भाजप जिंकण्याची शक्यता EXITPOLL नुसार वर्तवण्यात आली आहे.
advertisement
अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात मंडीमधून काँग्रेसचे दिग्गज नेते विक्रमादित्य सिंह मैदानात उतरले आहेत. मागील अनेक वर्षांपासून मंडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विक्रमादित्य सिंह हे तिथलं मोठं व्यक्तिमत्त्व आहे. पण कंगनाच्या पुढ्यात विक्रमादित्य यांचा डोलारा उभा राहू शकेल का असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
advertisement
कंगनानं भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून स्वत:चा दमदार प्रचार केला आहे. अनेक मंदिरांना भेटी देणं, मंडीतील लोकांशी बोलणं अशा अनेक गोष्टी तिनं सातत्यानं केल्या आहेत. कंगनाने वेळोवेळी मंडीतील लोकांच्या समस्या आणि मंडीबद्दल तिच्या मनात असलेल्या भावना सर्वांसमोर व्यक्त केल्यात. तगडा प्रचार करण्यात कंगना कुठेच कमी पडली नाहीये. आता जनता कंगनाला साथ देणार का हे काही तासांनी समोर येणार आहे.
advertisement
14 मे रोजी कंगनाचं नाव नोंदवून घेण्यात आलं. निवडणूकीला उभं राहण्याआधी कंगनानं तिचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात कंगनाच्या संपत्तीची संपूर्ण माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंगनाकडे 3 मर्सिडिज कार आहेत. एत वेस्पा स्कूटर आहे. Mercedes Maybach GLS 600 4M ही कंगनाची सर्वात महागडी कार आहे. ज्याची किंमत 3,19,22,718 इतकी आहे. तर कंगनाच्या वेस्पा स्कूटरची किंमत 53,827 इतकी आहे.
advertisement
इतकंच नाही तर कंगनाकडे एकूण 6.70 किलो सोनं आहे ज्याची किंमत जवळपास 5 कोटींच्या पुढे आहे. कंगनाकडे 50 लाखांची 60 किलो चांदी असल्याची माहिती तिनं दिली आहे. त्याचप्रमाणे तिच्याकडे 3 कोटींचे हिरे देखील आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 03, 2024 4:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Lok Sabha Election 2024 Result : कंगना रणौत होणार का पहिल्यांदाच खासदार? जनता देणार का साथ?