लव्ह, फॅमिली आणि धम्माल! ‘मनाचे श्लोक’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पूरग्रस्तांसाठी टीमकडून मोठी मदत

Last Updated:

Marathi movie Manache Shlok : ‘मना’चे श्लोक’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. टीझर आणि गाण्यांनी आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असताना, नुकताच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर लाँच करण्यात आला.

News18
News18
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कलाकारांची फौज घेऊन आलेला, प्रेम आणि कुटुंबाची गोड कहाणी सांगणारा चित्रपट ‘मनाचे श्लोक’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. टीझर आणि गाण्यांनी आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असताना, नुकताच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर लाँच करण्यात आला. विशेष म्हणजे, याच खास सोहळ्यात चित्रपटाच्या टीमने पूरग्रस्तांना अडीच लाख रुपयांची मदत जाहीर करून सामाजिक भान जपलं.
‘मनाचे श्लोक’चा ट्रेलर खूपच मजेशीर आणि आकर्षक आहे. ट्रेलरमध्ये श्लोक आणि मनवाच्या केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळते, पण त्यांची प्रेमकथा वाटते तितकी सोपी नाहीये!

‘मनाचे श्लोक’ च्या धमाकेदार ट्रेलरमध्ये काय आहे?

श्लोकच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली आहे, तर मनवाच्या कुटुंबातही तिच्या लग्नाची गडबड सुरू आहे. या सगळ्या धामधुमीत दोघांच्या स्वप्नांचं काय होणार? ते दोघे एकत्र येऊन लग्नासाठी तयार होतील का? अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता ट्रेलरने वाढवली आहे. यात हसू, गोडवा आणि काही भावनिक क्षणही पाहायला मिळतात.
advertisement
चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणते, “हा चित्रपट फक्त श्लोक आणि मनवाचा प्रवास नाही, तर त्यांच्या कुटुंबांचाही आहे. यात नाती, प्रेम, मैत्री आणि खूप मजा आहे. प्रेक्षकांना हे सगळं आपलंच वाटेल आणि ते नक्कीच या गोष्टीत रमून जातील.”
advertisement

कधी रिलीज होणार फिल्म?

प्रस्तुतकर्ता नितीन वैद्य यांच्या मते, ही आजच्या काळातील प्रेमकथा असली तरी, त्यात कुटुंबाची चौकट आहे. निर्माते संजय दावरा म्हणाले, “यातील प्रसंग सगळ्यांच्याच घरात घडतात. लहानसहान गमतीजंमती आणि अनपेक्षित वळणं प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.”
advertisement
या चित्रपटात मृण्मयी देशपांडे सोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब यांसारखे तरुण कलाकार आहेत, तर लीना भागवत, मंगेश कदम आणि शुभांगी गोखले असे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
लव्ह, फॅमिली आणि धम्माल! ‘मनाचे श्लोक’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, पूरग्रस्तांसाठी टीमकडून मोठी मदत
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement