2 तास 12 मिनिटांचा जबरदस्त थरार! काळजाचा ठोका चुकवणारा 'हा' चित्रपट पाहाच

Last Updated:

Best Court Room Drama : मनोज बाजपेयी अभिनीत 'सिर्फ एक बंदा काफी' हे हा कोर्टरूम ड्रामा हा वीकेंडला ओटीटीवर तुम्ही नक्की पाहू शकता.

News18
News18
Court Room Drama Movie : काही चित्रपट असे असतात जे माणसाला आतून हलवून टाकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कोर्टरूम ड्रामा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुमची झोप उडेल. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. थिएटरमध्ये या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. 2 तास 12 मिनिटांच्या या चित्रपटाचं नाव आहे 'सिर्फ एक बंदा काफी है'. या चित्रपटात मनोज बाजपेयी प्रमुख भूमिकेत आहे. मनोजने या चित्रपटात आपली भूमिका चोख निभावली आहे. तसेच पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र एक केलेला पाहायला मिळतो. या चित्रपटासमोर 'द ट्रायल' आणि 'मामला लीगल है'देखील फिके पडले होते. 2023 मध्ये हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. आजही समाजात पसरलेल्या अंधश्रद्धेचं वास्तव उघड करणारं या चित्रपटाचं कथानक आहे.
'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटात आपल्या भक्तावर अन्याय करणारा एक कुकर्मी बाबा दाखवला आहे. आपल्या वासनेसाठी अल्पवयीन मुलीसोबत तो चुकीचं कृत्य करतो. त्यानंतर आपल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देणाऱ्या वकीलांचा (मनोज बाजपेयी) हा कोर्टरूम ड्रामा आहे. हा वकील शेवटी धर्माच्या नावाखाली पाखंड पसरवणाऱ्या बाबाला तुरुंगात पाठवतो. प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा हा चित्रपट आहे.
advertisement
अपूर्व सिंह दिग्दर्शित 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटात मनोज बाजपेयी, अदिती सिंह अंद्रिजा, सूर्य मोहन कुलश्रेष्ठ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दीपक किंगरानी यांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले आहेत.
advertisement
'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटातून एक भयानक वास्तव मांडण्यात आलं आहे. 2023 मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सर्वोत्तम चित्रपटांत या चित्रपटाचा समावेश आहे. न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि अंधभक्त अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम मुद्द्याला हात घालणारी आहे. चित्रपटातील क्लायमॅक्स हादरवून टाकणारे आहेत. आज वीकेंडला एक उत्तम 'कोर्ट रूम ड्रामा' पाहायचा असेल तर 'एक बंदा काफी है' नक्की पाहा. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
मराठी बातम्या/मनोरंजन/
2 तास 12 मिनिटांचा जबरदस्त थरार! काळजाचा ठोका चुकवणारा 'हा' चित्रपट पाहाच
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement