लग्नाला यायचं हं! अखेर तारीख ठरली, प्राजक्ता गायकवाडने शेअर केली लग्नाची पत्रिका, कुठे पार पडणार लग्नसोहळा?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Gaikwad Wedding : नुकताच प्राजक्ताचा शंभूराज खुटवड यांच्यासोबत साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि आता तिने आपल्या शाही लग्नाची पत्रिका शेअर करून चाहत्यांना आनंदाची मोठी बातमी दिली आहे.
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या क्षणाची चर्चा मराठी मनोरंजन विश्वात रंगली होती, तो क्षण आता जवळ आला आहे! ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता खऱ्या आयुष्यातही ‘शंभूराजां’ची झाली आहे! नुकताच प्राजक्ताचा शंभूराज खुटवड यांच्यासोबत साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि आता तिने आपल्या शाही लग्नाची पत्रिका शेअर करून चाहत्यांना आनंदाची मोठी बातमी दिली आहे.
लग्नाची पत्रिका झाली व्हायरल!
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने कुंकवाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या साखरपुड्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली होती. अखेर पुण्यातील एका शानदार सोहळ्यात मित्रमंडळी आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा पार पडला. प्राजक्ताने या सोहळ्यासाठी पारंपरिक लुकऐवजी डिझायनर साडीला पसंती दिली होती.
आता या क्युट कपलच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पत्रिकेनुसार, प्राजक्ता आणि शंभूराज यांचा विवाह सोहळा २ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजून २४ मिनिटांनी होणार आहे.
advertisement
advertisement
कोण आहेत प्राजक्ताचे पती ‘शंभूराज’?
प्राजक्ताचा होणारा पती शंभूराज खुटवड हे एक पैलवान तसेच उद्योजक आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे कुटुंब राजकारणातही सक्रिय असल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजेच, प्राजक्ता आता कला आणि राजकारण-उद्योग अशा दोन्ही क्षेत्रांशी जोडली जाणार आहे.
‘येसूबाईंची’ भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवलेल्या प्राजक्ताने यापूर्वी ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, ‘आई माझी काळुबाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. अभिनय क्षेत्रात नेहमीच चमकदार कामगिरी करणारी ही अभिनेत्री आता वैयक्तिक आयुष्यातही एका नव्या आणि सुंदर पर्वाला सुरुवात करत आहे. चाहत्यांनी लग्नाच्या बातमीबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 03, 2025 8:02 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
लग्नाला यायचं हं! अखेर तारीख ठरली, प्राजक्ता गायकवाडने शेअर केली लग्नाची पत्रिका, कुठे पार पडणार लग्नसोहळा?