'त्यांच्या समोर हात का टेकले?' मनाचे श्लोक वादावर महेश मांजरेकरांनी ठासून सांगितलं, सुनावले खडे बोल

Last Updated:

Mahesh Manjrekar : ज्येष्ठ दिग्दर्शक आणि स्पष्टवक्ते महेश मांजरेकर यांनी मृण्मयी आणि निर्मात्यांच्या सिनेमाचे नाव बदलण्याच्या निर्णयावरच तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

News18
News18
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टी सध्या एका नव्या समस्येने ग्रासली आहे, ती म्हणजे चित्रपटाच्या शीर्षकावरून होणारे वाद आणि त्यानंतर सिनेमाच्या टीमला घ्यावी लागणारी माघार. नुकताच हा प्रत्यय अभिनेत्री मृण्मयी देशपांडेला आला. मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' या चित्रपटाच्या नावावर काही संघटनांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, अखेर मृण्मयीने नमते घेऊन चित्रपटाचे नाव बदलले. 'मनाचे श्लोक' ऐवजी आता तो 'तू बोल ना' या नव्या नावाने प्रदर्शित झाला आहे.

तासाभरातच 'शरणागती' पत्करली?

चित्रपटाच्या नावामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा करत पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील अनेक थिएटर्समध्ये शो थांबवण्यात आले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी मृण्मयीला पाठिंबा दिला असतानाही, तिने फार काळ न थांबता त्वरित नाव बदलण्याचा निर्णय घेतला. या तात्काळ शरणागतीवर आता ज्येष्ठ दिग्दर्शक आणि स्पष्टवक्ते महेश मांजरेकर यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
लवकरच महेश मांजरेकर यांचा आगामी चित्रपट 'पुन्हा शिवाजी राजे भोसले' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्त त्यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'ला दिलेल्या मुलाखतीत मृण्मयी आणि निर्मात्यांच्या सिनेमाचे नाव बदलण्याच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उभे केले.

"माझ्या वेळी मी शेवटपर्यंत लढलो!"

advertisement
मांजरेकरांनी यावेळी त्यांच्या गाजलेल्या 'शिक्षणाच्या आयचा घो' या चित्रपटाच्या वेळचा अनुभव सांगितला, जेव्हा त्यांनाही याच प्रकारच्या दबावाला सामोरे जावे लागले होते. मांजरेकर म्हणाले, "मनाचे श्लोक या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी एवढे लोक पुढे आले असतानाही, निर्मात्यांनी अवघ्या तासाभरात नाव बदलण्याचा निर्णय का घेतला? मी माझ्या 'शिक्षणाच्या आयचा घो' चित्रपटाच्या वेळी शेवटपर्यंत थांबलो होतो, मी ठामपणे सांगितले होते की मी नाव बदलणार नाही!"
advertisement
महेश मांजरेकरांचा स्पष्ट युक्तिवाद असा आहे की, तुम्ही एकदा असा दबाव स्वीकारला की, समोरच्या लोकांना पुन्हा हल्ला करण्यासाठी 'आणखी प्रोत्साहन' मिळते.

एकदा घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहायला हवे

मांजरेकरांनी सिनेमाच्या सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवरही जोर दिला. ते म्हणाले, "जर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी दिली आहे, तर कोणीही त्यावर आक्षेप घेऊ नये, हे माझे ठाम मत आहे. निर्माते किंवा कलाकारांनी एकदा घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहायला हवे."
advertisement
सुरुवातीला 'मनाचे श्लोक' ही मनवा आणि श्लोक यांच्या नावाची कथा म्हणून आलेल्या या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन यांसारखे तरुण चेहरे आणि शुभांगी गोखले, उदय टिकेकर यांसारखे ज्येष्ठ कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'त्यांच्या समोर हात का टेकले?' मनाचे श्लोक वादावर महेश मांजरेकरांनी ठासून सांगितलं, सुनावले खडे बोल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement