Gautami Patil : 'आधी महाराष्ट्राचा बिहार केलास, आता...', गौतमी पाटीलवर संतापला मराठमोळा अभिनेता
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gautami Patil car accident : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात गौतमीच्या नावावर असलेल्या भरधाव कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक सामाजी मरगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई : प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील पुन्हा एकदा एका गंभीर प्रकरणामुळे चर्चेत असून तिच्या अडचणी वाढल्या आहेत. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात गौतमीच्या नावावर असलेल्या भरधाव कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक सामाजी मरगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, अपघातानंतर गौतमी आणि तिच्या गाडीतील लोकांनी दाखवलेल्या अमानुष वृत्तीमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अपघातानंतर पळ काढला, गाडी लगेच उचलली
या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता पवन चौरे याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. त्याने संतप्त पोस्ट टाकून गौतमीवर थेट आरोप केले आहेत. पवन चौरे म्हणाला, “गौतमी पाटील, तू महाराष्ट्राचा बिहार केलास हे तर खरंच आहे. मग आता तू गरीब जनतेलाही त्रास द्यायचा ठेका घेतला आहेस का? तुझी गाडी एका रिक्षाला उडवते आणि तिथून तू पळून जातेस! पोलीस पोहोचायच्या आत ती गाडी लगेच उचलली जाते, याचा अर्थ काय? प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
advertisement
पवनने पुढे म्हटले की, रिक्षाचालक बिचारा आज रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. एवढं होऊनही चार दिवसानंतरही गौतमीने माणुसकीच्या नात्याने साधी विचारपूसही केली नाही. "या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो," असं पवनने ठणकावून सांगितलं. एका सामान्य माणसाला जेवढं वर घेऊन जातो, तेवढंच खालीही आपटू शकतो, असा इशाराही त्याने दिला.
मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली दखल
advertisement
मंगळवारी पहाटे ५ वाजता गौतमी पाटीलच्या गाडीने रिक्षाला धडक दिली. रिक्षाचालकाच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.
पाटील यांनी तात्काळ पोलीस उपायुक्तांना दूरध्वनी करून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. कारमधील चालक कोण होता, त्याला अटक करा, गाडी ताब्यात घ्या आणि मुख्य म्हणजे रिक्षाचालकाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च गौतमीकडून वसूल करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी गौतमीला कायदेशीर सूचना बजावली आहे. या प्रकरणातील सत्य आणि आरोपींना कठोर शिक्षा कधी होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil : 'आधी महाराष्ट्राचा बिहार केलास, आता...', गौतमी पाटीलवर संतापला मराठमोळा अभिनेता