Dadasaheb Phalke Award 2023: मळ्याळम सुपरस्टार ते राष्ट्रीय आयकॉन, मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mohanlal Dadasaheb Phalke Award: मोहनलाल यांना 2023 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. 23 सप्टेंबर 2025 रोजी हा सन्मान दिला जाईल. त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे.
नवी दिल्ली : मलयाळम सिनेमाचे सुपरस्टार मोहनलाल यांना 2023 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीवर भारत सरकारला हा निर्णय जाहीर करताना आनंद होत आहे.
प्रेरणादायी कारकीर्द
मोहनलाल यांची भव्य सिनेमाई सफर आजवरच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. ते केवळ एक महान अभिनेता नसून दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी भारतीय सिनेमात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अपार प्रतिभेने आणि मेहनतीने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नवे मापदंड निर्माण केले आहेत.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
मोहनलालजी उत्कृष्टता आणि बहुआयामी प्रतिभेचे प्रतीक आहेत. दशकानुदशके त्यांनी मलयाळम सिनेमा आणि रंगभूमीला नवी दिशा दिली आहे. केरळच्या संस्कृतीबद्दल त्यांना खोल आस्था आहे. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी सिनेमातही अप्रतिम भूमिका केल्या आहेत. विविध माध्यमांमधून त्यांनी दाखवलेले सिनेमाई कौशल्य खरोखर प्रेरणादायी आहे.
ശ്രീ മോഹൻലാൽ ജി പ്രതിഭയുടെയും അഭിനയ വൈവിധ്യത്തിന്റെയും പ്രതീകമാണ്. പതിറ്റാണ്ടുകൾ നീണ്ട സവിശേഷമായ കലാസപര്യയിലൂടെ, മലയാള സിനിമയിലും നാടകത്തിലും പ്രമുഖ വ്യക്തിത്വമായി നിലകൊള്ളുന്ന അദ്ദേഹത്തിന്, കേരള സംസ്കാരത്തിൽ തീവ്രമായ അഭിനിവേശമുണ്ട്.തെലുങ്ക്, തമിഴ്, കന്നഡ, ഹിന്ദി സിനിമകളിലും… https://t.co/4MWI1oFJsJ pic.twitter.com/MJp4z96RlV
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2025
advertisement
पुरस्कार सोहळा
हा मानाचा पुरस्कार 23 सप्टेंबर 2025 रोजी 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. गेल्या वर्षी हा सन्मान दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मिळाला होता.
मोहनलाल यांची ओळख व प्रवास
जन्म : 21 मे 1960, एलंथूर (केरळ)
पदार्पण : 1978 – थिरानोत्तम
advertisement
पहिली मोठी ओळख : 1980 – मंजिल विरिंजा पूक्कळ
कामगिरी : 350 हून अधिक चित्रपटांत भूमिका
पुरस्कार : अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेते
सन्मान : भारत सरकारकडून पद्मश्री व पद्मभूषण
बहुआयामी कलाकार
मोहनलाल यांनी प्रत्येक प्रकारच्या भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. विनोदी, गंभीर, अॅक्शन, रोमँटिक – अशा प्रत्येक शैलीत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांच्या सहज अभिनयशैलीमुळे आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्समुळे ते भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 9:54 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dadasaheb Phalke Award 2023: मळ्याळम सुपरस्टार ते राष्ट्रीय आयकॉन, मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार