अनैसर्गिक लैंगिक संबंध, शारीरिक छळ अन्... हजार आरोप केल्यानंतर राखी सावंतने संपवलं प्रकरण, आदिल दुर्रानीसोबतचा वाद मिटला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यातील वादावर मुंबई हायकोर्टाने शांततेचा पडदा टाकला, परस्पर सहमतीने दाखल केलेली FIR रद्द केली, दोघेही न्यायालयात उपस्थित होते.
मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिचा एक्स पती आदिल दुर्रानी यांच्यातील वाद गेल्या अनेक महिन्यांपासून धुमाकूळ घालत होता. एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करत दोघांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, आता या संपूर्ण विवादावर मुंबई हायकोर्टाने शांततेचा पडदा टाकला आहे. बुधवार, १५ ऑक्टोबर रोजी हायकोर्टाने दोघांनीही एकमेकांविरुद्ध दाखल केलेले FIR परस्पर सहमतीने रद्द केले.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, "परस्पर सहमतीने दोघांमध्ये तडजोड झाली असल्याने, आता हे एफआयआर प्रलंबित ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे एफआयआर आणि त्यापुढील चार्जशीट रद्द करण्यात येत आहेत." न्यायालयाने नमूद केले की, हे सर्व एफआयआर केवळ वैवाहिक वादातून दाखल करण्यात आले होते.
advertisement
कोर्टाने हा निर्णय दिला तेव्हा राखी सावंत आणि आदिल दुर्रानी हे दोघेही न्यायालयात उपस्थित होते. दोघांनीही कोर्टाला सांगितले की, एफआयआर रद्द करण्यास आपली कोणतीही हरकत नाही.
राखीने आदिलवर कोणते आरोप केले होते?
राखी सावंतने आदिल दुर्रानीवर गुन्हेगारी धमकी, छळ आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप केला होता. तर दुसरीकडे, आदिल दुर्रानीने असा आरोप केला होता की, राखी सावंतने त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याची सार्वजनिक प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
निकाह ते घटस्फोट
राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी २०२२ मध्ये इस्लामिक रीतीरिवाजानुसार लग्न केले होते, पण त्यांचे वैवाहिक आयुष्य फार काळ टिकले नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली. यानंतर काही दिवसांतच त्यांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल करून खळबळ उडवून दिली होती. पण आता कोर्टाच्या या निर्णयामुळे या दोघांमधील कायदेशीर लढाई आता संपली असून दोघांनीही आपापल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 8:14 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अनैसर्गिक लैंगिक संबंध, शारीरिक छळ अन्... हजार आरोप केल्यानंतर राखी सावंतने संपवलं प्रकरण, आदिल दुर्रानीसोबतचा वाद मिटला