बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिसला नीलम गिरीचा बोल्ड अवतार, नव्या गाण्याने इंटरनेटवर घातला धुमाकूळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Neelam Giri : 'बिग बॉस १९' मध्ये आपल्या साध्या आणि दिलखुलास स्वभावाने ओळख निर्माण केलेली भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरी शोमधून बाहेर पडली असली, तरीही ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुंबई: 'बिग बॉस १९' मध्ये आपल्या साध्या आणि दिलखुलास स्वभावाने ओळख निर्माण केलेली भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरी शोमधून बाहेर पडली असली, तरीही ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिगबॉसच्या घराबाहेर आल्यानंतर निलमने कामावर लक्ष केंद्रित करत आहे. या शोनंतर नीलमची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून चाहत्यांसाठी तिने लगेचच एक मोठे सरप्राईज दिले आहे. तिचे नवीन गाणे सोशल मीडियावर तुफान हिट झाले आहे.
रिलीज होताच गाण्याने वेधले लक्ष
नीलम गिरी भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय चेहरा आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच तिचे फॅन फॉलोईंग तुफान वाढले असून, ती आता जोरदार काम करताना दिसत आहे. नीलमच्या या नवीन गाण्याचे शीर्षक ‘सूट में लागब ऐश्वर्या’ असे आहे. हे गाणे प्रसिद्ध गायिका शिल्पी राज यांनी गायले आहे, तर गाण्यात नीलमसोबत अभिनेता प्रवेश लाल यादव दिसत आहे.
advertisement
नीलम आणि प्रवेश लाल यादव यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. प्रवेश लाल यादव यांनी या गाण्याला आपला आवाज देण्यासोबतच त्याचे निर्मिती देखील केली आहे. इतकंच नाही, तर बिग बॉसच्या घरातून बाहेर येण्यापूर्वी नीलमच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला होता. नीलमच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मनमोहनी’ असून, याचे दिग्दर्शन राजकुमार करत आहेत.
advertisement
लवकरच रिलीज होणार नवा सिनेमा
हा चित्रपट खूप भावनिक अँगलवर आधारित आहे. चित्रपटाची कथा एका अशा मुलीभोवती फिरते, जी आपल्या कुटुंबासाठी काहीही करण्याची तयारी ठेवते. 'मनमोहनी' चित्रपट समाजातील वाईट गोष्टी आणि तडजोडीवर प्रकाश टाकतो. बिग बॉसनंतर नीलम गिरी आता तिच्या करिअरच्या पुढच्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 10:55 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिसला नीलम गिरीचा बोल्ड अवतार, नव्या गाण्याने इंटरनेटवर घातला धुमाकूळ


