2 तास 44 मिनिटांचा सस्पेन्स-थ्रिलर, 'हा' चित्रपट पाहिला नाही तर काय पाहिलं? त्याच्यापुढे 'कांतारा'चं रहस्यही पडलंय फिकं

Last Updated:

Suspense Thriller Movie : ऋषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर 1' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण ओटीटीवरील एका अॅक्शन-थ्रिलर चित्रपटासमोर 'कांतारा चॅप्टर 1' फिका पडला आहे.

News18
News18
Suspense Thriller Movie : बॉक्स ऑफिसवर सध्या 'कांतारा चॅप्टर 1' हा बहुचर्चित चित्रपट धुमाकूळ घालत आहे. 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ 4 दिवसांतच 300 कोटींचा टप्पा पार केला आहे आणि अजूनही प्रचंड वेगाने कमाई करत आहे. याआधी आलेल्या ‘कांतारा’च्या पहिल्या भागालाही जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटातील सस्पेन्स, थ्रिल आणि अ‍ॅक्शनने प्रेक्षकांना भारावून टाकले होते. पण आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो ‘कांतारा’इतकाच नाही तर काही अंशी अधिक सस्पेन्सफुल आणि थरारक आहे. शिवाय IMDb वरही या चित्रपटाला जबरदस्त रेटिंग मिळालं आहे.
सस्पेन्समध्ये ‘कांतारा’पेक्षा पुढे आहे 'हा' चित्रपट
'वडा चेन्नई' (Vada Chennai) असं या चित्रपटाचं नाव आहे. 17 ऑक्टोबर 2018 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्या राजेश हे कलाकार झळकले होते. या चित्रपटाला 7 वर्षं लोटून गेली असली तरी त्याची चर्चा आजही कायम आहे. धनुष हा अभिनेता आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो आणि या चित्रपटातही त्याने आपल्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तुम्हाला जर हा चित्रपट पाहायचा असेल, तर तो प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) वर उपलब्ध आहे.
advertisement
काय आहे स्टोरी?
'वडा चेन्नई' हा 2018 मध्ये आलेला एक तमिळ चित्रपट आहे. 'अन्बू' या एका हुशार कॅरम प्लेअरभोवती हा चित्रपट फिरतो. जो आपल्या गरिबीमुळे गुन्हेगारी जगतात पाऊल टाकतो. हळूहळू तो एका स्थानिक माफिया टोळीचा भाग बनतो. पण जेव्हा त्याला कळतं की ही टोळी त्याच्या स्वतःच्या परिसराला उद्ध्वस्त करण्याचा कट रचते आहे, तेव्हा तो त्याविरुद्ध उभा ठाकतो. जसजशी कथा पुढे सरकते, तसतसा सस्पेन्स गडद होत जातो.
advertisement
रेटिंगमध्येही 'कांतारा'च्या पुढे आहे 'वडा चेन्नई'
रेटिंगच्या बाबतीतही 'वडा चेन्नई' हा चित्रपट 'कांतारा'पेक्षा कमी नाही. IMDb वर जिथे ‘कांतारा’ला 8.2 रेटिंग आहे, तिथे ‘वडा चेन्नई’ला 8.4 रेटिंग मिळाले आहे. म्हणजेच, रेटिंगमध्ये ‘वडा चेन्नई’ आघाडीवर आहे. वेत्रिमारन यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. यात धनुष प्रमुख भूमिकेत आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या राजेश, डॅनियल बालाजी आणि अ‍ॅन्ड्रिया जेरमिया हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. सर्व कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट अधिक प्रभावशाली झाला आहे. जर तुम्हाला क्राइम-ड्रामा प्रकारचे चित्रपट आवडत असतील, तर हा चित्रपट नक्की पाहा.
मराठी बातम्या/मनोरंजन/
2 तास 44 मिनिटांचा सस्पेन्स-थ्रिलर, 'हा' चित्रपट पाहिला नाही तर काय पाहिलं? त्याच्यापुढे 'कांतारा'चं रहस्यही पडलंय फिकं
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement