Phir Hera Pheri : उठा ले रे बाबा! 'बाबू भाईं'च्या 'घरा'वर बुलडोझर, कायमचं जमीनदोस्त होणार! पण का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Phir Hera Pheri Movie : 'फिर हेरा फेरी' सिनेमाच्या शूटिंगमुळे अजरामर झालेली इमारत आता ब्रिज तोडकामात बाधित होणार आहे.
Phir Hera Pheri : 'फिर हेरा फेरी' या 2006 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने हा चित्रपट पाहतात. जॉनी लिव्हर, सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल अशी तगडी स्टारकास्ट असणारा हा अजरामर चित्रपट आहे. 1944 मध्ये स्थापन झालेल्या इमारतीत या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं होतं. आज ही इमारत जीर्णावस्थेत आहे. आता एलफिन्स्टन ब्रिजच्या कामात बाबू भाईंचं ते घर असणारी ही ऐतिहासिक इमारत जमीनदोस्त होणार आहे.
advertisement
बाबू भाईंचं 'ते' घर आता कायमचं इतिहासजमा
'सूरज बिल्डिंग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ', असं या एल्फिन्स्टन पुलाला लागून असणाऱ्या इमारतीचं नाव आहे. 'फिर हेरा फेरी' या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे ही इमारत चर्चेत आली होती. त्यावेळी 9 दिवस या इमारतीत चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. 'फिर हेरा फेरी'सह आणखी काही चित्रपटांचं, मालिकांचं आणि वेबसीरिजचं, जाहिरातींचं शूटिंग या इमारतीत झालं आहे. 'फिर हेरा फेरी'तील अनेक विनोदी सीन या इमारतीत शूट झाले आहेत.
advertisement
'फिर हेरा फेरी'च्या शूटिंगदरम्यान या इमारतीतील रहिवाश्यांनी निर्माते फिरोज नाडियाडवाला यांना शूटिंगदरम्यान सहकार्य केलं होतं. तसेच चित्रपटाचं शूटिंग नक्की कसं चालतं या सर्व गोष्टी या रहिवाश्यांना जवळून पाहता आल्या होत्या. या चाळीतील नळावरची भांडणं असो, कलाकारांचे अजरामर डायलॉग असो सर्व गोष्टींनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.
advertisement
बाबू भाईंचं 'ते' घर असणाऱ्या या इमारतीसोबत स्थानिक रहिवाश्यांच्याही बऱ्याच आठवणी आहेत.
1944 मध्ये स्थापन झालेल्या या इमारतीला 81 वर्ष झाले आहेत. इमारतीवर बुलडोझर पडल्याने ऐतिहासिक ठेवा आता राहणार नाही. एल्फिन्स्टन पुलाला अगदी लागून असणारी ही इमारत होती. ऐतिहासिक ठेवा असणारी ही इमारत आता तुटणार असून रहिवाशांना इतर ठिकाणी घरं दिली जाणार आहेत.
advertisement
'फिर हेरा फेरी'च्या आगामी भागाची प्रेक्षकांना आता प्रतीक्षा आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 12:35 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Phir Hera Pheri : उठा ले रे बाबा! 'बाबू भाईं'च्या 'घरा'वर बुलडोझर, कायमचं जमीनदोस्त होणार! पण का?