मी जिवंत! पूनम पांडेने स्वत:चा व्हिडीओ केला शेअर, पोस्टचं सांगितलं कारण

Last Updated:

पूनम पांडेचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्या पोस्टने एकच खळबळ उडाली होती. पण आता तिने स्वत:च समोर येत आपण जिवंत असल्याचं सांगितलंय.

पूनम पांडे
पूनम पांडे
मुंबई : मॉडेल पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शुक्रवारी तिचा मृत्यू झाल्याची पोस्ट पब्लिश झाली होती. या पोस्टने एकच खळबळ उडाली होती. पण आता तिने स्वत:च समोर येत आपण जिवंत असल्याचं सांगितलंय. तसंच त्या पोस्टचे कारणही तिने शेअर केले आहे. मी जिवंत आहे आणि मला गर्भाशयाचा कर्करोग झालेला नाही. पण दुर्दैवाने या रोगाचा सामना करावा लागणाऱ्या हजारो महिलांचा यामुळे मृत्यू होत आहे. या आजाराशी लढण्यासाठी #DeathToCervicalCancer मोहिम सुरू केल्याचं तिने सांगितलं आहे.
पूनम पांडेने सोशल मीडिया पेजवर लाइव्ह येत मृत्यूच्या बातमीबद्दल माफीही मागितली आहे. कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी असं केल्याचं तिने म्हटलं आहे. तिच्या मृत्यूच्या पोस्टने निर्माण झालेल्या प्रश्न, शंका कुशंकांना तिने उत्तर दिलं.
advertisement
पूनम पांडेने म्हटलं की, गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झालेला नाही. दुर्दैवाने मी त्या शेकडो आणि हजारो महिलांबद्दल हे बोलू शकत नाही ज्यांनी गर्भाशयाच्या कर्करोगाने प्राण गमावला. त्यांना याबाबत माहिती नाही, याबाबत माहिती नाहीय की काय करायचं.
मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलेय की इतर कर्करोगांपेक्षा गर्भाशयाचा कर्करोग रोखता येऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमचे चेकअप करावे लागेल आणि एचपीव्ही लस घ्यावी लागेल.
advertisement
पुनम पांडेच्या इन्स्टाग्रामवर लिहिण्यात आलं होतं की,  सकाळ आमच्यासाठी खूप कठीण होती. आम्हाला हे सांगताना दु:ख होत आहे की आमची लाडकी पूनमचं सर्वायकल कॅन्सरने निधन झालं आहे. तिच्या संपर्कात आलेल्यांना तिच्याकडून खूप प्रेम मिळालं. या कठीण काळात तिच्या खासगीपणा जपावा अशी आम्ही विनंती करतो.
मराठी बातम्या/मनोरंजन/
मी जिवंत! पूनम पांडेने स्वत:चा व्हिडीओ केला शेअर, पोस्टचं सांगितलं कारण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement