Pranit More : डेंग्यूमुळे प्रणीत मोरेची अशी अवस्था, बेडवरून उठताही येईना; हॉस्पिटलमधील VIDEO समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pranit More Hospital Video : प्रणीत मोरेचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात प्रणीतची प्रकृती ठीक नसल्याचं दिसतंय. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
बिग बॉस सीझन 19 मधून नेहल आणि बसीर यांच्यानंतर स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मेरे घरातून बाहेर गेला. प्रणीत मोरे घरात आजारी पडला, त्याचा डेंग्यू झाल्याने त्याला खेळ पुढे नेता आला नाही. सलमान खानने प्रणीत मोरे घरातून बाहेर जात असल्याची घोषणा केली होती. असं असतानाच आता प्रणीत मोरे पुन्हा एकदा बिग बॉस 19 च्या घरात येणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान प्रणीत मोरेचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात प्रणीतची प्रकृती ठीक नसल्याचं दिसतंय. त्याचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणीत मोरेवर सध्या उपचार सुरू आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, प्रणीतचं टेम्पररी इविक्शन करण्यात आलं आहे. तो बरा झाल्यानंतर त्याला सीक्रेट रुममध्ये आणण्यात येणार आहे. हा सर्वस्वी निर्णय प्रणीतचा असणार आहे. त्याला शोमध्ये पुढे जायचं असल्यास त्याला पुन्हा शोममध्ये आणण्यात येईल. सध्या तरी प्रणीत या खेळात नाही. प्रणीत मागील आठवड्यात घराचा कॅप्टन झाला होता आणि त्याच आठवड्यात तो घरातून बाहेर पडला.
advertisement
दरम्यान बिग बॉस खबरीच्या माहितीनुसार, डेंग्यूमुळे प्रणीतची तब्येत खूप खराब झाली आहे. त्याच्या बेडवरून उठताही येत नाहीये. तो डॉक्टरांची स्पेशल टिम त्याच्याकडे लक्ष ठेवून आहे. प्रणीतचा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो बेडवर झोपला आहे. अचानक त्याचा जाग येते आणि तो उठून बसतो. बसल्यानंतर तो फार अशक्त असल्याचं दिसतं. प्रणीतचा हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. प्रणीत लवकर बरा व्हावा आणि पुन्हा बिग बॉसमध्ये सहभागी व्हावा अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
advertisement
मागील आठवड्यात अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि मृदुल तिवारी यांना सोडून सगळ्यांना नॉमिनेट करण्यात आलं आहे. अभिषेक आणि अशनूर माइक न घालता घरात बोलत होते त्यावरून बिग बॉसनी दोघांनी अनेकदा टोकलं पण तरीही त्यांनी ऐकलं नाही. दोघांच्या क्लिप्स बिग बॉसने दाखवल्या आणि त्यानंतर दोघांना थेट नॉमिनेट करण्यात आलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 8:07 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pranit More : डेंग्यूमुळे प्रणीत मोरेची अशी अवस्था, बेडवरून उठताही येईना; हॉस्पिटलमधील VIDEO समोर


