'मी शोधून मारीन!' एवढा कुणावर संतापला पुष्कर जोग? पुढे म्हणाला...
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
पुष्करनं खऱ्या आयुष्यात आलेल्या सायबर क्राइमच्या अनुभवाबद्दल नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, 'मला सायबर क्राइमचा अनुभव आला. हल्ली खूप स्कॅम होतात.'
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : सगळी नाती एका बाजूला आणि बाप-लेकीचं नातं एका बाजूला. याच नात्यावर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा ‘दि ए आय धर्मा स्टोरी’ हा चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून तो प्रचंड उत्सुकता वाढवणारा आहे.
अभिनेता पुष्कर जोग दिग्दर्शित दि ए आय धर्मा स्टोरी चित्रपटात तो स्वत: आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर, अभिनेत्री दीप्ती लेले प्रमुख भूमिकेत आहेत. या टीमशी 'लोकल18'नं एक्सक्लुझिव्ह संवाद साधला.
advertisement
चित्रपटात पुष्कर जोगनं अरविंद धर्माधिकारी ही भूमिका साकारली आहे. ए आयच्या मदतीनं फेक व्हिडीओ बनवून अरविंदच्या मुलीला कोणीतरी किडनॅप केलेलं असतं. तिला वाचवण्याची त्याची धडपड या चित्रपटातून दिसून येते. अरविंद मुलीला वाचवता वाचवता स्वत: यात कसा अडकतो...तो मुलीची सुटका करण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणं उत्साहवर्धक असणार आहे.
advertisement
चित्रपटाविषयी बोलताना पुष्करनं खऱ्या आयुष्यात आलेल्या सायबर क्राइमच्या अनुभवाबद्दल नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, 'बिग बॉसनंतर युट्यूब व्हिडिओमध्ये माझ्या बायकोला आणि मुलीला मॉर्फ करण्यात आलं. मला खूप दु:ख झालं. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळू शकतात पण तुम्ही माझ्या कुटुंबाला समाविष्ट नाही करू शकत. मी अभिनेता आहे तुम्ही बोलताच माझ्याबद्दल पण ज्या क्षणी माझ्या फॅमिलीला इनवॉल्व्ह केलं जाईल, मी तुम्हाला शोधून मारीन. तुम्हाला तो कुणी हक्क नाही दिला, माझ्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका. माझं काम नाही आवडलं, पिक्चर नाही आवडला तर बोला, वैयक्तिकरित्या तुम्ही बोलू नाही शकत. तर मला सायबर क्राइमचा अनुभव आला. हल्ली खूप स्कॅम होतात', असं त्यानं सांगितलं. दरम्यान, एआयमुळे सर्वसामान्य कुटुंबांचं कसं नुकसान होऊ शकतं आणि त्यातून बाहेर कसं पडावं यावरच भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 17, 2024 5:14 PM IST