Pushpa 2 The Rule सिनेमा पाहिला अन्.... संभाजीनगरमधील चाहत्यांची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित पुष्पा 2 द रुल हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. छत्रपती संभाजीनगरमधील चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहू.

+
पुष्पा

पुष्पा 2: द रुल सिनेमा पाहिला अन्.... संभाजीनगरमधील चाहत्यांची पहिली प्रतिक्रिया

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: अभिनेता अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित पुष्पा 2 हा सिनेमा आज 5 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. दिग्दर्शक सुकुमारन यांच्या चित्रपटाचा पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला. छत्रपती संभाजीनगरमधील सिनेमागृहांत चाहत्यांनी चित्रपटाला तुफान प्रतिसाद दिला. चित्रपटाचा पहिला शो संपताच पैसा वसूल चित्रपट असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी लोकल18 सोबत बोलताना दिल्या.
पुष्पा 2 हा अतिशय चांगला व एकदम हिट असा सिनेमा आहे. मला हा सिनेमा खूप आवडला. या सिनेमासारखा दुसरा कुठला सिनेमा आतापर्यंत पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया एका प्रेक्षकानं सांगितलं. तर पुष्पा 2 हा सिनेमा पुष्पा सिनेमाच्या पहिल्या भागापेक्षाही चांगला झाला आहे. अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांनी अतिशय उत्तम अभिनय केला आहे. त्यामुळे मला हा सिनेमा अतिशय आवडला, असं देखील एका चाहत्यानं सांगितलं.
advertisement
पुष्पा 2 सारखा चित्रपट बॉलिवूडमध्ये होणे नाही. आतापर्यंतचे कमाईचे सगळे रेकॉर्ड हा चित्रपट मोडणार आहे. चित्रपटातील गाणी, अभिनय आणि संगीत सगळंच भारी आहे. त्यामुळे सर्वांनी हा सिनेमा आवर्जून चित्रपटगृहांत जावून पाहावा, असं एक चाहता म्हणाला. तर पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग जिथं संपला तिथूनच दुसरा भाग सुरू होतोय. चित्रपटाचं कथानंक आणि अभिनय खूप चांगला झाला आहे. त्यामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो. अगदी पैसा वसूल चित्रपट असल्यानं सर्वांनी पाहावा, असा असल्याचंही एका चाहत्यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
advertisement
दरम्यान, पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर चाहते पुष्पा 2 या चित्रपटाची वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वीच 100 कोटींची कमाई चित्रपटाने केली होती. त्यामुळे सर्वांचं लक्ष प्रदर्शनावर होतं. आज पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला असून चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकींग जोरात सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Pushpa 2 The Rule सिनेमा पाहिला अन्.... संभाजीनगरमधील चाहत्यांची पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement