Sachin Pilgaonkar : 'मला सचिनचं गाणं दाखवा...' राजकुमार बडजात्यांची ती अखेरची इच्छा, पिळगांवकरांनी सांगितलेला तो किस्सा पुन्हा व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sachin Pilgaonkar : राजश्री प्रोडक्शनचे निर्माते ताराचंद बडजात्या यांचा मुलगा राजकुमार बडजात्या यांची एक आठवण सचिन पिळगांवकर त्यांनी शेअर केली आहे. सचिन यांच्या करिअरमध्ये राजश्री आणि राजकुमार बडजात्या यांचा मोलाचा वाटा आहे.
ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगांवकर गेली अनेक वर्ष मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. इंडस्ट्रीतील त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. अनेक मोठ्या लोकांबरोबरच्या आठवणींचा खूप मोठा खजिना त्यांच्याकडे आहे. अनेक मुलाखतींदरम्यान सचिन पिळगांवकर यांनी आठवणी शेअर केल्यात. त्यांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात त्यांनी राजश्री प्रोडक्शनचे निर्माते ताराचंद बडजात्या यांचा मुलगा राजकुमार बडजात्या यांची एक आठवण त्यांनी शेअर केली आहे. सचिन यांच्या करिअरमध्ये राजश्री आणि राजकुमार बडजात्या यांचा मोलाचा वाटा आहे.
सचिन पिळगांवकर राजकुमार बडजात्या यांना राजा बाबू म्हणायचे. दोघांनी एकत्र 'अखियोंके झरोको से', 'गीत गाता चल', 'गोपाल किशन', 'नदीया के पार' आणि 'जाना पेहचाना' सारखे सिनेमे केले. हे सिनेमे सचिन यांच्या करिअरमध्ये मैलाचे दगड ठेवले.
advertisement
राजा बाबू यांच्या निधनानंतर त्यांच्या नातवानं सचिन पिळगांवकरांना हा किस्सा सांगितला होता. सचिन पिळगांवकर यांना राजू बाबू यांच्या मृत्यूची बातमी मिळताच ते अंत्यदर्शनासाठी पोहोचले तेव्हा सूरज बडजात्या यांनी त्यांना सांगितलं की, माझ्या मुलाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.
सचिन यांनी मुलाखतीत सांगितलं, "राजकुमार यांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. राजा बाबू झोपले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा नातू बसला होता. तेव्हा त्याने त्यांना विचारलं की, तुमची इच्छा काय आहे. तुमची शेवटी इच्छा काय असं नाही विचारलं."
advertisement
तेव्हा ते हसून म्हणाले, "मला ते सचिनचं गाणं दाखवा श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम... मला सचिनला बघायचं आहे." हे सांगताना सचिन पिळगांवकर भावुक झाले. ते पुढे म्हणाले, "त्याने मग मोबाईलमध्ये ते गाणं त्यांना दाखवलं. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला."
advertisement
राजश्री प्रोडक्शनला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सचिन पिळगांवकर यांनी राजश्रीला दिलेल्या मुलाखतीत ही आठवण सांगितली होती. त्यांच्या मुलाखतीमधील हा किस्सा पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 9:21 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Sachin Pilgaonkar : 'मला सचिनचं गाणं दाखवा...' राजकुमार बडजात्यांची ती अखेरची इच्छा, पिळगांवकरांनी सांगितलेला तो किस्सा पुन्हा व्हायरल