Guess Who : वडील कॉन्स्टेबल, आई हॉस्पिटलमध्ये आया; मुलगी झाली बॉलिवूडची 'आयटम गर्ल', फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
फोटोत दिसणाऱ्या या लहान मुलीला ओळखलं का? फोटोत ती खूप खुश दिसतेय पण तिचं बालपण तितकं आनंदी नव्हती. अभिनेत्री आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अनेक बॉलिवूड कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका अभिनेत्रीचा फोटो समोर आला आहे. या फोटोत दिसणारी ही छोटी मुलगी बॉलिवूडची फेमस अभिनेत्री आहे. फोटोत ती खूप खुश आणि हसतमुख दिसतेय. पण तिचं बालपण तितकं आनंदात गेलं नाही. बालपणापासून तिने आयुष्य जगण्यासाठी खूप संघर्ष केला.
फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी आता बॉलिवूडची अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या ग्लॅमरने आणि बोल्डनेसने बॉलिवूडला आकर्षित केलं. 1997 साली तिनं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अभिनेत्रीचं बालपण खूप कष्टात गेलं. पण आज ती कोट्यवधींची मालकीण आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ही अभिनेत्री म्हणजे सध्या प्रेक्षकांना हसवणारा कॉमेडीचा बॉम्ब आहे. या अभिनेत्रीशिवाय बिग बॉसचा कोणताही सीझन पूर्ण होत नाही. तिला बॉलिवूडची 'ड्रामा गर्ल' म्हणून ओळखलं जातं
advertisement
फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राखी सावंत आहे. राखी सावंत आज तिचा 46 वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. राखीचा जन्म 25 नोव्हेंबर 1978 साली झाली. तिचं खरं नाव नीरू भेडा असं आहे. राखीचे वडील कॉन्स्टेबल होते. राखीची आईने त्यांच्याशी दुसरं लग्न केलं. आनंद सावंत असं त्यांचं नाव होतं. आईने दुसरं लग्न केल्यानंतर राखीने देखील त्यांचंच सावंत हे आडनाव आपल्या नावामागे लावलं. राखीची आई हॉस्पिटलमध्ये आयाचं काम करायची.
advertisement
राखीचे आई-वडील खूप शिस्तीचे होते. राखीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला घरी डान्स करायला परवानगी नव्हती. तिने जराही डान्स केला तर तिची आई तिला चप्पलेने मारायची.

राखीने 1997 मध्ये 'अग्निचक्र' सिनेमातून डेब्यू केला. त्यानंतर तिने 'जोरू का गुलाम' आणि 'जिस देश में गंगा रहता है' सारख्या सिनेमातही काम केलं. 2003 मध्ये राखीने 'चुरा लिया है तुमने' सिनेमात आयटम नंबरसाठी चार वेळा ऑडिशन दिलं आणि तिचं त्यातं सिलेक्शन झालं.
advertisement
2003 मध्ये 'मोहब्बत है मिर्ची' मधील राखीचा डान्स खूप व्हायरल झाला. त्यानंतर तिने हिमेश रेशमियाचं गाणं केलं तेही खूप व्हायरल झाला. त्यानंतर राखीला छोट्या छोट्या भूमिका मिळू लागल्या. 2005 मध्ये ती 'परदेसिया' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. तिचा हा डान्स तिच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2025 7:16 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Guess Who : वडील कॉन्स्टेबल, आई हॉस्पिटलमध्ये आया; मुलगी झाली बॉलिवूडची 'आयटम गर्ल', फोटोतील अभिनेत्रीला ओळखलं?


