बाहुबलीच्या आईचा एकेकाळी संजय दत्तसोबत रोमान्स, 33 वर्षांपूर्वी खलनायक गाण्यानं वेड लावलेल्या अभिनेत्रीला ओळखलत का?

Last Updated:

1993 मध्ये तिने बॉलिवूडचा 'संजू बाबा' म्हणजेच संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. सुभाष घई यांच्या गाजलेल्या 'खलनायक' चित्रपटात राम्या कृष्णन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : सिनेविश्वात काही भूमिका अशा असतात की त्या अभिनेत्याच्या नावापेक्षाही मोठ्या होतात. 'बाहुबली' चित्रपटामधील 'शिवगामी देवी' हे पात्र असंच अजरामर झालं. "मेरा वचन ही मेरा शासन है!" असं म्हणत डोळ्यांत अंगार घेऊन पडद्यावर अभिनय साकारणाऱ्या या अभिनेत्रीला आज संपूर्ण जग 'बाहुबलीची आई' म्हणून ओळखतं. पण, तुम्हाला माहिती आहे का? आज साऊथची सर्वात पॉवरफुल अभिनेत्री मानली जाणारी हीच शिवगामी देवी, 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत होती आणि अनेकांना आता हे लक्षात देखील नाही.
आम्ही बोलत आहोत दिग्गज अभिनेत्री राम्या कृष्णनबद्दल. आज जरी आपण राम्या कृष्णन यांना साऊथच्या चित्रपटात साडी आणि मोठ्या कुंकवात पाहत असलो, तरी 1993 मध्ये तिने बॉलिवूडचा 'संजू बाबा' म्हणजेच संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. सुभाष घई यांच्या गाजलेल्या 'खलनायक' चित्रपटात राम्या कृष्णन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
या चित्रपटातील 'नायक नहीं खलनायक हूँ मैं' या आयकॉनिक गाण्यामध्ये राम्या यांनी संजय दत्तसोबत केलेला रोमान्स आजही चाहत्यांच्या लक्षात आहे. त्या गाण्यातील त्यांचा बोल्ड डान्स आणि संजय दत्तसोबतची केमिस्ट्री पाहून हीच ती शिवगामी देवी आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतोय.
advertisement
राम्या कृष्णन यांनी केवळ 'खलनायक'च नाही, तर अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातही मुख्य भूमिका साकारली होती. त्या काळात राम्या यांनी आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. विनोद खन्ना, शाहरुख खान यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबतही त्यांनी काम केलं आहे. मात्र, नंतर त्यांनी आपला मोर्चा साऊथ सिनेसृष्टीकडे वळवला आणि तिथे त्या खऱ्या अर्थाने 'क्वीन' ठरल्या.
advertisement
राम्या यांनी त्यांच्या करिअरमध्ये 400 हून अधिक चित्रपट केले आहेत. मात्र, राजामौली यांच्या 'बाहुबली' चित्रपटाने त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. शिवगामी देवीच्या भूमिकेसाठी आधी श्रीदेवी यांना विचारण्यात आलं होतं, पण त्यांनी नकार दिल्यानंतर ही भूमिका राम्या यांच्याकडे आली आणि त्यांनी या पात्राचं सोनं केलं.
वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही राम्या कृष्णन यांचा पडद्यावरचा वावर एखाद्या तिशीतील अभिनेत्रीला लाजवेल असाच आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जेलर' चित्रपटातही त्यांनी रजनीकांत यांच्या पत्नीची भूमिका उत्तमरीत्या साकारली आहे. 'खलनायक'मधील ती बोल्ड डान्सर आणि 'बाहुबली'मधील न्यायप्रिय शिवगामी, असा राम्या कृष्णन यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बाहुबलीच्या आईचा एकेकाळी संजय दत्तसोबत रोमान्स, 33 वर्षांपूर्वी खलनायक गाण्यानं वेड लावलेल्या अभिनेत्रीला ओळखलत का?
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement