Rani Mukerji : राणी मुखर्जीने नकार दिलेला 'तो' चित्रपट झाला सुपरहिट! 22 वर्षांनंतरही आहे सर्वांचा फेव्हरेट; तुम्ही पाहिलाय?
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Rani Mukerji: राणी मुखर्जीने 22 वर्षांपूर्वी रिजेक्ट केलेला एक चित्रपट त्यावेळी थिएटरमध्ये चांगलाच गाजला. आजही या चित्रपटाची तेवढीच क्रेझ पाहायला मिळते.
Rani Mukerji : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी गेल्या तीन दशकांपासून भारतीय सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. नुकताय अभिनयासाठी त्यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजवर आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आजही विविध धाटणीच्या चित्रपटांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण एकेकाळी एका चित्रपटातून तिला बाहेरचा रस्ता दाखवला होता. पण हाच चित्रपट आज 22 वर्षांनंतरही अनेकांचा फेव्हरेट आहे. राणी मुखर्जीने आपल्या करिअरमध्ये 'लगान', ‘मोहब्बतें’, ‘भूल भुलैया’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या होत्या. तसेच 2003 मध्ये रिलीज झालेला ग्रेस सिंह यांचा चित्रपट आजही चाहते पुन्हा-पुन्हा पाहतात. एकेकाळी या चित्रपटालाही राणी मुखर्जी यांनी रिजेक्ट केलं होतं.
राणी मुखर्जीने रिजेक्ट केलेला संजय दत्तचा चित्रपट
संजय दत्त आणि ग्रेस सिंह यांच्या या चित्रपटाचं नाव 'मुन्नाभाई एमबीबीएस' असं आहे. 19 डिसेंबर 2003 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अरशद वारसी, बोमन ईरानी आणि कुरुष देबू अशी तगडी स्टारकारस्ट असणाऱ्या चित्रपटात संजय दत्त ग्रेसी सिंहसोबत स्क्रीन शेअर करताना दिसले होते. पण ग्रेसी सिंह या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. ग्रेसी सिंहआधी राणी मुखर्जी यांना या चित्रपटासाठी निवडले होते. पण त्यांनी हा चित्रपट करण्याचं नाकारलं. ग्रेसी सिंहने 'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये डॉक्टरच्या भूमिकेला न्याय दिला होता.
advertisement
'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा बॉलिवूड गाजवणाऱ्या राजकुमार हिराणी यांनी सांभाळली होती. तर विधु विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. 22 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाचं बजेट त्यावेळी 10 कोटी रुपये होतं. पण जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 35 कोटी रुपये कमावले आणि भारतात 23 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
advertisement
राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 3'ची प्रतीक्षा
राणी मुखर्जी या हिंदी मनोरंजनसृष्टीतील एक अभ्यासू अभिनेत्री असून त्यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. राणी मुखर्जी यांचा 'मर्दानी 3' हा आगामी चित्रपट 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात अभिनेत्रीचं एक वेगळं रुप पाहायला मिळेल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 1:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rani Mukerji : राणी मुखर्जीने नकार दिलेला 'तो' चित्रपट झाला सुपरहिट! 22 वर्षांनंतरही आहे सर्वांचा फेव्हरेट; तुम्ही पाहिलाय?