'पुरुषांना फक्त एकदा पिरियड्स यावे', असं का म्हणाली रश्मिका मंदाना, जुना VIDEO होतोय व्हायरल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rashmika Mandanna Reaction on Periods Statement : रश्मिका मंदनाने जगपती बाबू यांच्या शोमध्ये पुरुषांना किमान एकदा तरी पिरियड्स यावे, असं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीच्या या वक्तव्यावरुन नवा वाद सुरू झाला असून तिने आता याबाबत प्रतिउत्तर दिलं आहे.
Rashmika Mandanna : जगपती बाबूच्या 'जयम्मु निश्चयमु रा' या शोमध्ये रश्मिका मंदाना पिरियड्स बाबत बोलताना दिसून आली. अभिनेत्री म्हणाली की, पुरुषांना किमान एकदा तरी पिरियड्स यायला हवे. त्यामुळे महिलांना दर महिन्याला काय-काय सहन करावं लागतं हे त्यांना समजेल. या विधानानंतर नेटकऱ्यांनी रश्मिकाला ट्रोल केलं. पुरुषांविषयी असंवेदनशील असल्याचं तिला म्हटलं गेलं. एकीकडे या वक्तव्यामुळे रश्मिकाचं कौतुक झालं, काहींनी तिला पाठिंबा दिला तर दुसरीकडे काहींनी मात्र तिला चांगलच ट्रोल केलं. एकंदरीत अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा मिश्र प्रतिसाद मिळाला. अशातच आता या नेटकऱ्यांच्या या मिश्र प्रतिक्रियांदरम्यान रश्मिकाने आपलं मत मांडलं आहे.
रश्मिका मंदानाची पिरियड्सविषयीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
रश्मिकाच्या एका फॅन पेजने तिचा पिरियड्सबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका पुरुषांनाही एकदा तरी पिरियड्स यायला हवे याबद्दलचं तिचं मत मांडताना दिसून येत आहे. रश्मिका म्हणतेय,"कधी कधी आम्हाला फक्त इतकंच हवं असतं की आमच्या वेदना आणि भावना समजल्या जाव्यात. हे कधीही तुलना करण्याबद्दल किंवा पुरुषांच्या जबाबदाऱ्यांना कमी लेखण्याबद्दल नव्हतं. पण काही लोकांना अहंकार दुखावला आणि गोष्ट वेगळ्याच दिशेने गेली. याच कारणाने मला कआता कोणत्याही मुलाखतीला जाण्याची भीती वाटतेय. कारण मी काहीतरी वेगळं बोलते आणि त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा घेतला जातो".
advertisement
रश्मिका काय म्हणाली?
जगपति बाबूंच्या शोमध्ये रश्मिका म्हणाली,“हो, मला वाटतं पुरुषांनी किमान एकदा तरी पिरियड्सचा अनुभव घ्यावा, म्हणजे त्यांना त्या वेदना आणि त्रास समजेल. हार्मोनल असंतुलनामुळे आम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि पुरुषांना हा प्रेशर समजावणं अवघड असतं, कारण कितीही समजावलं तरी ते ती भावना अनुभवू शकत नाहीत. म्हणूनच जर पुरुषांना एकदा जरी पिरियड्सचा अनुभव आला, तर त्यांना समजेल की हा त्रास कसा असतो.”
advertisement
And this no one will talk about.. 😄❤️
The fear of going to shows and interviews is this for me.. I mean something and it’s taken in something else entirely.. :(
— Rashmika Mandanna (@iamRashmika) November 12, 2025
रश्मिका पुढे म्हणाली,"मला इतका भयानक पिरियड्सचा त्रास होतो की एकदा तर मी त्यामुळे बेशुद्ध पडले होते. मी अनेक टेस्ट केल्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला. पण कुणालाही कारण समजलं नाही. दर महिन्याला मी विचार करते, ‘देवा, तू मला इतकं का त्रास देतो आहेस?’ मला वाटतं कोणीही तो त्रास तेव्हाच समजू शकतो जेव्हा तो स्वतः अनुभवतो. म्हणूनच मला वाटतं पुरुषांनी किमान एकदा तरी पिरियड्सचा अनुभव घ्यावा.”
advertisement
रश्मिका मंदानाचा 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. राहुल रवींद्रन यांनी या रोमँटिक तेलुगू चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'पुरुषांना फक्त एकदा पिरियड्स यावे', असं का म्हणाली रश्मिका मंदाना, जुना VIDEO होतोय व्हायरल


