दर आठवड्याला यायच्या 14 लाख चिठ्ठ्या...! राजेश खन्ना-देवानंद पेक्षा होती या मराठी अभिनेत्रीची क्रेझ
- Published by:Minal Gurav
 
Last Updated:
Marathi Actress : 90 च्या दशकातील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची क्रेझ ही राजेश खन्ना आणि देवानंद यांच्यापेक्षाही जास्त होती. अभिनेत्रीला दर आठवड्याला 14 लाख चिठ्ठ्या यायच्या. ही अभिनेत्री कोण?
टेलिव्हिजनवर काम करणारे कलाकार प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. टेलिव्हिजनवर आपल्या एका स्मित हास्यानेच प्रेक्षकांची मनं जिंकणारी एक मराठीमोळी अभिनेत्री. जिला टेलिव्हिजन पाहून द आठवड्याला 14 लाख चिठ्ठ्या यायच्या. तिला या शोनं खरी ओळख मिळवून दिली. कोण होती ती मराठमोळी अभिनेत्री.
नव्वदच्या दशकात एक मराठमोळा टेलिव्हिजनवर आला, जिच्या स्मित हास्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणाऱ्या शोपेक्षा हा शो खूपच वेगळा होता. अभिनेत्रीला तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच हा शो मिळाला.
या शोचं नाव होतं 'सुरभि'. तेव्हाचा टेलिव्हिजनचा हा सर्वात हिट शो होता. सिद्धार्थ काक चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी पाठवलेल्या चिठ्ठ्या वाचायचे. याच शोमधून अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं तिच्या करिअरची सुरुवात केली होती. याच शोमध्ये रेणुका शहाणे सवाल जवाब सिगमेन्टही घ्यायची, ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळायचा.
advertisement
अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं हाच सुनबाईचा भाऊ या मराठी सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. पण तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती सुरभी या शोमुळे. या शोमुळे रेणुका शहाणे घराघरात ओळखली गेली. त्यावेळी सोशल मिडिया नव्हतं. त्यामुळे लोक कार्यक्रमाचं, रेणुकाच्या कामाचं कौतुक चिठ्ठ्यांमधून करायचे.
advertisement
त्यावेळेस सुरभी हा शो इतका लोकप्रिय होता ज्याच्यासाठी एका आठवड्याला 14 लाख चिठ्ठ्या यायच्या. रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक प्रेक्षकांच्या चिठ्ठ्या वाचायचे आणि त्यांची उत्तरे द्यायचे. हा शो जवळपास 10 वर्षांपर्यंत चालला. या काळात रेणुका शहाणेला टेलिव्हिजनची राणी म्हटलं जात होतं.
advertisement
रेणुका शहाणेनं सुरभीच्या पीसी और मौसी या सिनेमा टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. ज्यात तिच्याबरोबर पंकज बैरी आणि फरीदा जलाल होत्या. त्याचबरोबर सर्कस, लाइफलाइन सारख्या शोमध्येही तिनं काम केलं. पण तिला खरी ओळख ही सुरभी या शोमुळेच मिळाली.
त्यानंतर रेणुका शहाणे 'हम आपके हैं कौन' या सिनेमात दिसली. हा सिनेमा ऑल टाइम ब्लॉकबस्टर ठरला. सिनेमात तिने साकारलेली पूजा भाभी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर रेणुका अनेक हिंदी, मराठी सिनेमात काम केलं. लग्नानंतर तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. लवकरच तिचा 'उत्तर' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा पहिली टीझरही नुकताच रिलीज झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 3:26 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
दर आठवड्याला यायच्या 14 लाख चिठ्ठ्या...! राजेश खन्ना-देवानंद पेक्षा होती या मराठी अभिनेत्रीची क्रेझ


