50 वर्ष इंडस्ट्री गाजवली, शेकडो सिनेमात काम; पण सचिन पिळगावकरांचा फेव्हरेट फक्त हा एकच डायलॉग
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sachin Pilgaonkar Favorite Dialogue : पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अनेक मराठी सिनेमात काम केलं. पण त्यांचा आवडता डायलॉग कोणता आहे माहितीये?
मुंबई : अभिनेते सचिन पिळगावकर हे मागील 5 दशकं मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं. वयाच्या चौथ्या वर्षांपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून सुरूवात केलेल्या सचिन यांच्या अभिनयाचा प्रवास आजपर्यंत सुरू आहे. सचिन पिळगावरकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. केवळ अभिनय नाही तर लेखन, दिग्दर्शक, निर्मिती, गायन यासारख्या अनेक गोष्टींमध्ये ते मास्टर आहेत. त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मराठी सिनेमात काम केलं. अनेक सिनेमांची निर्मिती देखील केली. अनेक सिनेमांचे डायलॉग देखील लिहिले आहेत. पण सचिन पिळगावकर यांचा आवडता डायलॉग कोणता आहे माहितीये?
advertisement
सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या अनेक सिनेमात अनेक डायलॉग लिहिले आहेत. त्यातील काही डायलॉग हे लोकप्रिय झाले. धनंजय माने इथेच राहतात का हा तर इंडस्ट्रीतील कल्ट डायलॉग आहे. 35 वर्षांआधी आलेला हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे.
advertisement
सचिन पिळगावकर नुकतेच मराठी फिल्म अफेअर अवॉर्डमध्ये सहभागी झाले होते. या अवॉर्डमध्ये बोलताना त्यांनी त्यांच्या सिनेमातील आवडता डायलॉग सांगितला. फक्त सांगितला नाही तर बोलून देखील दाखवला. सचिन पिळगावकर यांना हा डायलॉग आवडत असेल हे अनेकांना वाटलं नव्हतं. पण हा सिनेमा आणि डायलॉग सचिन यांच्या फार जवळचा आहे.
advertisement
तुम्ही केलेल्या मराठी सिनेमातील आतापर्यंतचा तुमचा आवडता डायलॉग कोणता असा प्रश्न सचिन पिळगावकर यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी अशी ही बनवा बनवी या सिनेमातील सुधाचा डायलॉग बोलून दाखवला. स्त्री वेश करुन बंगल्यात राहायला आल्यानंतर सुधा सुधीरसाठी जो उखाणा घेते तो सचिन पिळगावकर यांचा आवडता डायलॉग आहे.
advertisement
advertisement
सचिन पिळगावकर यांचा आवडता डायलॉग
भारताने आकाशात सोडलं मोठं यान
भारताने आकाशात सोडलं मोठं यान
आणि नशीबाने पदरी पाडलं शंतनूचं ध्यान
अशीही बनवा बनवी
1988 साली आलेल्या अशीही बनवा बनवी या मराठीतील कल्ट सिनेमातील हा डायलॉग आहे. सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुशांत रे, सुप्रिया पिळगावकर , निवेदिता सराफ, प्रिया अरुण, अश्विनी भावे, सुधीर जोशी, नयनतारा अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. सिनेमातील गाणी हिट झाली. डायलॉग तर अनेक प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 11, 2025 1:12 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
50 वर्ष इंडस्ट्री गाजवली, शेकडो सिनेमात काम; पण सचिन पिळगावकरांचा फेव्हरेट फक्त हा एकच डायलॉग