ना दीपिका, ना प्रियांका, ना आलिया; संजय लीला भंसाळीच्या फिल्ममध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, प्रोमो पाहिला का?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Do Deewane Seher Mein: संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमामध्ये बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना वगळून मराठमोळ्या अभिनेत्रीला घेण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
मुंबई: बॉलिवूडमध्ये भव्यता आणि प्रेमकथांचा महाल उभा करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता प्रेक्षकांसाठी २०२६ चा व्हॅलेंटाईन डे खास बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत, 'दो दिवाने शहर में' या चित्रपटाचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'दो दिवाने शहर में' च्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना अनोखे, क्रिएटिव्ह ॲनिमेशन, सुंदर संगीत आणि शहराचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले.
निर्मात्यांनी सांगितले की, 'दो दिवाने शहर में' ही एक अशी प्रेमकथा आहे जी टाइमलेस आहे, पण त्याचबरोबर नवीन सुद्धा वाटते. हा चित्रपट आगामी वर्षातील सर्वात गोड आणि हृदयस्पर्शी प्रेम कहाण्यांपैकी एक असेल, जो सिनेमागृहात खूप दिवसांपासून न पाहिलेला रोमान्स परत आणेल.
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये मराठी अभिनेत्रीची वर्णी
दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटामध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या सिनेमामध्ये बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना वगळून मराठमोळ्या अभिनेत्रीला घेण्यात आले आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून, संपूर्ण देशाला वेड लावलेली मृणाल ठाकूर आहे.
advertisement
सिनेमाच्या प्रोमोमध्ये सिद्धांत आणि मृणाल एका संक्षिप्त, पण भावपूर्ण रूपात दिसले आहेत, ज्यामुळे त्यांच्यातील शांत आणि रोमँटिक केमिस्ट्री अधोरेखित झाली आहे. हा प्रोमो रिलीज होताच चाहत्यांनी यावर प्रेमाचा वर्षाव केला असून, ते चित्रपटासाठी खूप उत्सुक झाले आहेत. चित्रपट निर्मात्या झोया अख्तर यांना देखील सिद्धांत आणि मृणालची ही जोडी खूप आवडली आहे.
advertisement
advertisement
स्क्रीनवर पहिल्यांदाच दिसणार फ्रेश जोडी
रवी उदयवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून झी स्टुडिओज आणि संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रोडक्शन्सने याची निर्मिती केली आहे. सिद्धांत चतुर्वेदीने २०१९ मध्ये 'गली बॉय' मधील भूमिकेमुळे ओळख मिळवली आणि त्यानंतर त्याने १३ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच त्याचा 'धडक-२' हा चित्रपटही रिलीज झाला होता.
advertisement
मृणाल ठाकूरने टीव्हीवरून आपल्या करिअरला सुरुवात केली आणि आता ती बॉलिवूडमधील डिमांडिंग अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच ती 'सन ऑफ सरदार-२' मध्ये अजय देवगनसोबत दिसली होती आणि तिने दोन डझनांहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'दो दिवाने शहर में' हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे, जो व्हॅलेंटाईन डेच्या आठवड्यात येतो आहे. आता ही नवी जोडी बॉक्स ऑफिसवर किती जादू दाखवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 6:39 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
ना दीपिका, ना प्रियांका, ना आलिया; संजय लीला भंसाळीच्या फिल्ममध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, प्रोमो पाहिला का?


