जेव्हा 14 वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा संजीव कुमार यांनी घेतला होता ऑटोग्राफ, सांगितला पहिल्या फिल्मचा किस्सा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sachin Pilgaonkar : अभिनेते संजीव कुमार यांना 14 वर्षांच्या सचिन पिळगावकर यांचा अभिनय पाहून भुरळ पडली. त्यांनी थेट त्यांच्या घरी जाऊन ऑटोग्राफ घेतला होता. त्यांनी स्वत:हा किस्सा सांगितला.
मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते सचिन पिळगावकर सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या अनेक मुलाखती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंदी, मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलकारांचे किस्से त्यांनी सांगितले आहेत. त्यांच्या पहिल्या सिनेमाचा असाच एक किस्सा त्यांनी सांगितला आहे. वयाच्या चौथ्या वर्षी सचिन पिळगावकर यांचा हा माझा मार्ग एकला हा सिनेमा रिलीज झाला होता. 1962 साली रिलीज झालेला हा सिनेमा सचिन यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. त्यांना निरागस अभिनय अनेकांच्या आजही लक्षात आहे. हा 'माझा मार्ग एकला' हा सिनेमा पाहून प्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार यांनी सचिन यांच्या घरी जाऊन त्यांचा ऑटोग्राफ घेतला होता. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला.
रेडिओ सिटी मराठीशी बोलताना सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला समोर संजीव कुमार उभे होते. माझ्या वडिलांनी त्यांना बोलावलं, ते आत बसले म्हणाले सचिन आहे का? मी आलो बाहेर ते मला म्हणाले, 'मी आताच हा माझा मार्ग एकला हा सिनेमा बघून आलो आहे. मी आयुष्यात कोणाचाही ऑटोग्राफ घेतलेला नाही. मी माझ्या आयुष्यातली पहिली ऑटोग्राफ घेऊ इच्छितो, तू मला ऑटोग्राफ देशील का'. त्यांनी माझ्या पुढ्यात बुक ठेवली, पेन दिली. मी त्यांना ऑटोग्राफ दिली, माय डिअर हरीभाई विथ लव्ह सचिन."
advertisement
सचिन पिळगावकर यांनी पुढे सांगितलं, "हरिभाईंनी तो संपूर्ण सिनेमा पाहिला संध्याकाळी सात वाजता ते सिनेमा बघून बाहेर आले. त्यांनी विशू राजाला विचारलं की, सचिन कुठे राहतो माहिती आहे का? मला त्याच्या घरी घेऊन जाशील का? विशू राजांनी त्यांना माझ्या घरी आणलं. ते गाडीत बसले. जाताना सांताक्रूझमध्ये एका स्टेशनरी शॉपमध्ये हरीभाईंनी गाडी थांबलवली, एक ऑटोग्राफ बुक विकत घेतलं, एक पेन विकत घेतलं आणि ते माझ्या घरी आले. मी तेव्हा 14-15 वर्षांचा होतो"
advertisement
हा माझा मार्ग एकला या सिनेमात सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. राजा परांजपे हे सिनेमाचे दिग्दर्शिक होते. अभिनेते शरद तळवलकर, सीमा देव, राजा परांजपे, राजा पटवर्धन आणि जीवनकला हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 21, 2025 8:24 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
जेव्हा 14 वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा संजीव कुमार यांनी घेतला होता ऑटोग्राफ, सांगितला पहिल्या फिल्मचा किस्सा