'हे सोप्पं नाही...' प्रशांत दामलेंचं असं कर्तृत्व, संकर्षण कऱ्हाडेनं अखेर हातच जोडले

Last Updated:

Sankarshan Karhade -Prashant Damle : संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. नाटक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्स तो देत असतो. नुकतीच त्याने प्रशांत दामले यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे.

News18
News18
मुंबई : मराठी रंगभूमीवरील हरहुन्नरी अभिनेते प्रशांत दामले ज्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. अभिनेते संकर्षण कऱ्हाडेसाठी प्रशांत दामले हे गुरुस्थानी आहेत. दोघांनी एकत्र नाटकात काम करत आहेत. प्रशांत दामलेकडून संकर्षणनं अनेक गोष्टी शिकल्या आहेत. प्रशांत दामले यांचं मराठी रंगभूमीवरील कर्तृत्व हे अफाट आहे पण त्यांनी आता असं काही केलंय की जे पाहून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं 'हे सोप्पं नाही' म्हणत त्यांच्या पुढ्यात हातच जोडलेत.
संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. नाटक आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्स तो देत असतो. नुकतीच त्याने प्रशांत दामले यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. प्रशांत दामले यांचा आज 12 सप्टेंबरला वैयक्तिक असा नाटकाचा 13,300वा प्रयोग आहे. यानिमित्तानं त्यांचं कौतुक आणि शुभेच्छा देत संकर्षणनं पोस्ट लिहिली आहे.
advertisement
संकर्षणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आज आमच्या दामले सरांचा वैयक्तीक १३,३०० वा प्रयोग आहे.
'ते रा ह जा र ति न शे' वा प्रयोग … म्हणजे काय झाले हो…? एका प्रयोगाचे ३ तास जरी म्हणलं तरी आयुष्याचे 39,900  तास स्टेजवर आहे हा माणूस त्याच ऊर्जेने."
संकर्षणने पुढे लिहिलंय, "आता तुम्ही म्हणाल व्यवसाय आहे त्यांचा… त्याचे पैसे मिळतात त्यांना … मान्यंच आहे …पण 38 वर्षं कुठल्याही व्यवसायात किंवा मनोरंजनाच्या व्यवसायांत कधीही कंबरेखालचे विनोद नं करता, नाटकाशी , नाटकाला आलेल्या प्रेक्षकांशी प्रामाणीक राहून , काम करणं सोप्पं नाही हो"
advertisement
वाचा संकर्षणची संपूर्ण पोस्ट
advertisement
संकर्षणने पोस्टच्या शेवटी लिहिलंय, "माणुस नसतांना त्याची किंमत करण्यापेक्षा तो असतांना त्याचं मोल कळणं फार आवश्यक असतं… पण ३ पिढ्यांचं रंगमंचावरून मनोरंजन करणारं हे मराठी वैभव आपल्या महाराष्ट्रांत आहे हे आपणच मिरवणं हे फार महत्वाचं आहे … नाही का …??? खूप शुभेच्छा Prashant Damle सर.  तुम्ही फार मौल्यवान आहात" संकर्षणने संपूर्ण पोस्टमध्ये प्रत्येक वाक्याला प्रशांत दामले यांच्यासाठी हात जोडलेले इमोजी शेअर केले आहेत.
advertisement
प्रशांत दामले यांच्या 'शिकायला गेलो एक' या नाटकाचा प्रयोग आज 12 सप्टेंबरला रात्री 8.30 वाजता, मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह येथे आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हे सोप्पं नाही...' प्रशांत दामलेंचं असं कर्तृत्व, संकर्षण कऱ्हाडेनं अखेर हातच जोडले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement