ST Bus Fare: एलफिन्स्टन पुलाच्या तोडकामाचा एसटी प्रवाशांना भुर्दंड, तिकीट दरात वाढ, कारण काय?

Last Updated:

MSRTC Fare Hike : या प्रभादेवी स्थानकावरील पुलाच्या तोडकामाचा भुर्दंड एसटीच्या प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. याच्या परिणामी तिकिट दरात वाढ होणार आहे.

एलफिन्स्टन पुलाच्या तोडकामाचा एसटी प्रवाशांना भुर्दंड, खिशावरचा भार वाढणार, कारण काय?
एलफिन्स्टन पुलाच्या तोडकामाचा एसटी प्रवाशांना भुर्दंड, खिशावरचा भार वाढणार, कारण काय?
मुंबई: परळ आणि प्रभादेवी परिसराला पूर्व-पश्चिम जोडणारा महत्त्वाचा प्रभादेवी स्थानकावरील पूल हा प्रवासी आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या पुलाच्या जागी नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. मात्र, या प्रभादेवी स्थानकावरील पुलाच्या तोडकामाचा भुर्दंड एसटीच्या प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. याच्या परिणामी तिकिट दरात वाढ होणार आहे.
प्रभादेवी स्थानकावरील पुलाच्या तोडकामामुळे प्रवासी वाहतूक वळवण्यात येणार आहे. याचा परिणाम एसटी महामंडळाच्या परळ आगारातील वाहतुकीवर होणार आहे. परळचे एसटी आगार हे पश्चिमेकडील सयानी रोड मार्गावर आहे. त्यामुळे पूल प्रवासी वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर एसटी महामंडळाच्या परळ आगारातील बस सेवेच्या मार्गात मोठे बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) नवीन उड्डाण पुलाचे आणि वरळी-शिवडी वरळी एलिवेटेड कनेक्टर पुलाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद झाल्यानंतर एलफिन्स्टन पुलाच्या मार्गे चालणारी एसटी बसची वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार आहे.
advertisement

परळ आगारातील बस कोणत्या मार्गावर धावणार?

नवीन नियोजनानुसार, परळ आगारातून दादरकडे जाणाऱ्या बसेसना मडके बुवा चौक (परळ टी.टी. जंक्शन) मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने पुढे नेले जाईल. यानंतर कृष्ण नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, मुपारी बाग जंक्शन, भारत माता जंक्शन आणि संत जगनाडे चौक मार्गे उजवे वळण घेत साने गुरुजी मार्गावरून बसेस चिंचपोकळी ब्रिजवर पोहोचतील. तेथून कॉम्रेड गणाचार्य चौक मार्गे एन.एम. जोशी मार्गावर वळून बस परत परळ आगारात दाखल होतील.
advertisement
या बदललेल्या मार्गामुळे प्रवासाचे अंतर वाढणार आहे. दादर ते परळ हे अंतर 6 किमी आहे. मात्र, आता एसटी बस फिरून येणार असल्यामुळे आता एसटी बसला 6.2 किमी अंतर कापावे लागणार आहे. परिणामी तिकीट दरातही एक टप्पा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता परळ आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता 10 रुपयांनी जास्त भाडे मोजावे लागणार आहे. एसटी महामंडळाने या बदलाची माहिती दिली एका पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे परळ आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता किमान 10 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. शिवनेरी आणि ई-शिवनेरी बसच्या मार्गातही बदल होणार असल्याने त्यांचा प्रवासी टप्पा वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या तिकीट दरात वाढ होणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ST Bus Fare: एलफिन्स्टन पुलाच्या तोडकामाचा एसटी प्रवाशांना भुर्दंड, तिकीट दरात वाढ, कारण काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement