Satara News : 'सातारा हिल मॅरेथॉन'मुळे रविवारी शहरातील वाहतूक बंद, वाचा संपूर्ण पर्यायी मार्ग

Last Updated:

Satara Hill Marathon : साताऱ्यामध्ये 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 'सातारा हिल मॅरेथॉन' स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहराच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे...

Satara Hill Marathon
Satara Hill Marathon
Satara News : साताऱ्यामध्ये रविवार, 14 रोजी आयोजित 'सातारा हिल मॅरेथॉन' स्पर्धेमुळे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत मॅरेथॉन मार्गावरील स्पर्धा संपेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मॅरेथॉनचा मार्ग
स्पर्धेची सुरुवात पोलीस परेड ग्राउंड येथून होईल. त्यानंतर स्पर्धक पोवई नाका-मरिआई कॉम्प्लेक्स-शाहू चौक-अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर बोगदा-येवतेश्वर-प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढे 500 मीटरपासून परत त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राउंडवर येतील. या मार्गावर रुग्णवाहिका, पोलीस आणि अग्निशमन दलाची वाहने वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक आणि गोडोली मार्गे शहरात येणारी वाहने : या वाहनांनी ग्रेड सेपरेटर मार्गे डी. बी. कदम मार्केट आणि राधिका सिग्नल येथून शहरात ये-जा करावे.
advertisement
बाँबे रेस्टॉरंट चौकातून शहरात येणारी वाहने : या वाहनांनी जिल्हा परिषद चौक-कनिष्ठ हॉल चौक-रिमांड होम मार्ग-जुना आर. टी. ओ. चौक किंवा बांधकाम भवन-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चौक-मुथा चौक-रिमांड होम मार्ग-जुना आर. टी. ओ. चौक-सुभाषचंद्र बोस चौक (भुविकास चौक) या मार्गांचा वापर करावा.
मुख्य बसस्थानक, राधिका सिग्नलहून महामार्गाकडे जाणारी वाहने : या वाहनांनी ग्रेड सेपरेटर मार्गे शहराबाहेर पडावे.
advertisement
सज्जनगड, ठोसेघर आणि परळीकडून ये-जा करणारी वाहने : या वाहनांनी शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोडने शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक आणि गोडोली मार्ग असा प्रवास करून ग्रेड सेपरेटर मार्गे डी. बी. कदम मार्केट-राधिका सिग्नल येथून शहरात ये-जा करावे.
कास बाजूकडून येणारी वाहने : मॅरेथॉन संपेपर्यंत या वाहनांना प्रकृती हेल्थ रिसॉर्ट मार्गे सातारा शहरात येता येणार नाही. त्याऐवजी त्यांनी एकीव फाटा-एकीव-मोळेश्वर-कुसुंबीपुरा-कुरूंबी-मेंढा या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
advertisement
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Satara News : 'सातारा हिल मॅरेथॉन'मुळे रविवारी शहरातील वाहतूक बंद, वाचा संपूर्ण पर्यायी मार्ग
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement