Satara News : धावत्या दुचाकीवर माकडाची झडप, जखमी पत्नीसमोर पतीचा दुर्दैवी अंत, महाबळेश्वर हादरलं!

Last Updated:

Satara News : महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका माकडाने अचानक दुचाकीवर झडप घातल्याने...

Satara News
Satara News
Satara News : महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका माकडाने अचानक दुचाकीवर झडप घातल्याने झालेल्या अपघातात देवळी गावातील आनंद सखाराम जाधव (वय-50) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे महाबळेश्वर परिसरातील माकडांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय घडले नेमके?
गुरुवारी संध्याकाळी आनंद जाधव आणि त्यांची पत्नी महाबळेश्वर शहरातील काम आटोपून आपल्या दुचाकीवरून देवळी गावाकडे परतत होते. तापोळा रस्त्यावरील चिखली परिसरातून जात असताना, खाद्याच्या शोधात असलेल्या एका माकडाने अचानक त्यांच्या चालत्या दुचाकीवर झडप घेतली. अनपेक्षित हल्ल्यामुळे आनंद जाधव यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि दोघेही रस्त्यावर जोरात आपटले.
या अपघातात आनंद जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
वाढता माकडांचा उपद्रव आणि ग्रामस्थांचा संताप
या घटनेनंतर देवळी आणि आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. महाबळेश्वर परिसरात माकडांचा उपद्रव ही एक मोठी समस्या बनली आहे. पर्यटकांच्या हातातून खाद्यपदार्थ हिसकावणे, वाहनांवर उड्या मारणे, हे प्रकार नित्याचे झाले आहेत. यापूर्वीही अशा घटनांमुळे छोटे-मोठे अपघात झाले आहेत, पण आता एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "वनविभाग आणि प्रशासनाने आतातरी जागे होऊन या माकडांचा बंदोबस्त करावा," अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.
advertisement
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Satara News : धावत्या दुचाकीवर माकडाची झडप, जखमी पत्नीसमोर पतीचा दुर्दैवी अंत, महाबळेश्वर हादरलं!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement