दिवाळी सोडून केदारनाथला पोहोचली सारा अली खान, फोटो शेअर करत म्हणाली, 'जगातील अशी एक जागा...'

Last Updated:

सारा अली खान पुन्हा एकदा केदारनाथ दर्शनाला गेली आहे.तीने पोस्ट शेयर करत आपली आध्यात्माकडे असणारे मन यातून व्यक्त केले आहे.तीची पोस्ट व्हायरल होत आहे.

News18
News18
बॅालिवूड अभिनेत्री सारा अली खान कायमच आपल्या सोशल मीडियाद्वारे नव्या नव्या पोस्ट शेयर करत असते. तीचे मन हे आध्यात्मिक आहे, हे तिने आपल्या स्वभावाने कायमच दाखवून दिले आहे. तसेच तिने आता एक नवीन पोस्ट शेयर केली. तिने त्या पोस्टमधून आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्या पोस्टमध्ये तिने तिच्या आवडती जागा केदारनाथ असे सांगितले आहे. तिने केदारनाथ मधील वरील पोस्ट शेयर केली आहे.
"ती जागा पुर्णपणे ओळखीची वाटते"
सोशल मीडियावर साराने केदारनाथ मधील फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत. केदारनाथची सुंदरता आणि तेथील लोकांचे आपलेपण त्यात तिने दाखवले आहे. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने 'जय श्री केदार' असे लिहीले आहे . त्यानंतर ती म्हणाली, " जगातील अशी एक जागा जिथे मला आपलेपणा वाटतो, प्रत्येक वेळेस मला ती जागा आश्चर्यकारक आणि चकित वाटते. मी धन्यवाद देते. तुम्ही मला सर्व दिले आणि मी जी आहे तेच मला बनवले." सारा खूप वेळा केदारनाथला भगवान भोलेनाथाच्या दर्शनाला गेली आहे. त्यावेळीही तिने असे फोटो, व्हिडिओ शेयर केले होते.
advertisement
advertisement
यावेळी तिने सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिला ' तु मुस्लिम असून हिंदू देवदेवतांचे दर्शन कशी घेतेस' अशा टीकाही केल्या आहेत. हे सगळं तिचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
साराचे नवे येणारे सिनेमे
'पति पत्नी और वो 2' या सिनेमातून ती आयुष्मान खुराना सोबत दिसणार आहे. हा सिनेमा 2019 मध्ये आलेला सिनेमा 'पति पत्नी और वो' या सिनेमाचा सिक्वेल आहे. यात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे सुद्धा होते. सारा याआधी 'मेट्रो… इन दिनों' या सिनेमातून दिसली होती.त्यात तिच्या अभिनयाचे भरभरुन कौतुक झाले होते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
दिवाळी सोडून केदारनाथला पोहोचली सारा अली खान, फोटो शेअर करत म्हणाली, 'जगातील अशी एक जागा...'
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement