स्वानंदीनंतर 'तारिणी' येतेय, पण कधी? किती वाजता? काय आहे स्टोरी?

Last Updated:

Tarini Serial Release Date : अभिनेत्री तेजश्री प्रधानची वीण दोघातलं ही तुटेना ही मालिका काही दिवसात सुरू होतेय. तेजश्रीसोबतच अभिनेत्री शिवानी सोनारची मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

News18
News18
मुंबई : झी मराठी वाहिनीवर अनेक नव्या मालिका सुरू होत आहेत. कमळी ही मालिका दोन आठवड्यांआधीच रिलीज झाली आहे. त्यानंतर अभिनेत्री तेजश्री प्रधानची वीण दोघातली ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता तारिणी ही मालिका देखील टेलिकास्टसाठी सज्ज झाली आहे. मालिकेची रिलीज डेट समोर आली आहे. काय असणार आहे मालिकेचा कथा? पाहूयात.

तारिणीची स्टोरी काय?

तारिणी बेलसरे. मुंबईत राहणारी. तारिणीची आई पोलीस खात्यात हेड कॉन्स्टेबल होती. अत्यंत प्रामाणिक पण तिच्यावर लाच घेण्याचे आरोप केले गेले. तिने त्या भीतीपोटी आत्महत्या केली असं समोर उभं केलं गेलं. तारिणीच्या वडिलांनी तेव्हा मुलीच्या भविष्याचा विचार करत दुसरं लग्न केलं. तारिणीची सावत्र आई मात्र घरात येताक्षणी त्या हेड कॉन्स्टेबल चा उल्लेखही घरात करायचा नाही असं सगळ्यांना सांगितलंय. पण आपली आई चुकीच कधीच वागू शकत नाही हा विश्वास तारिणीला आहे, म्हणून आपल्या आईच सत्य आणि खऱ्या गुन्हेगाराला तिला जगापुढे आणायचं म्हणून ती पोलिसात भरती भरती झाली.
advertisement
तारिणीसोबत केदार नावाचा एक मुलगा आहे ज्याचा निशाणा कधीच चुकत नाही. जशी तारिणी तिच्या आईच्या गुन्हेगाराचा शोध घेते आहे तसा केदार त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेल्या वडिलांचा शोध घेत आहे. दोघे एकमेकांना आधार आहेत. केदारच्या मनात तारिणी विषयी प्रेमाची भावना आहे पण तो तिला आजवर सांगू शकला नाही.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)



advertisement
अशाच वेळी मिडिया टायकून खांडेकरांच्या घरात तारिणी आणि केदार राहू लागतात. काय असं घडलं असेल की त्यांना खांडेकरांच्या घरात प्रवेश करावा लागतो. तारिणीने खांडेकरांच्या घरात शिरण्यामागचे काय असेल कारण? खांडेकरांच्या घरात तारिणीच्या आईच्या गुन्हेगाराचे धागेदोर सापडणार का?? ज्यामुळे तारिणी आणि केदार मध्ये दुरावा येईल? अशा प्रश्नासोबत मालिका सुरू राहते.
advertisement

तारिणीची रिलीज डेट 

या मालिकेचं कथा व पटकथा लेखन प्रल्हाद कुडतरकर याचं आहे. तर पूर्णानंद वांढेकर मालिकेचे संवाद लेखक आहेत. मालिकेच दिग्दर्शन करतायत भीमराव मोरे. तर मालिकेचे निर्माते एरिकॉन टेलिफिल्म्सचे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई आहे. तारिणी ही मालिका 11 ऑगस्ट पासून सोम-शुक्र रात्री 9.30 वाजता सुरू होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
स्वानंदीनंतर 'तारिणी' येतेय, पण कधी? किती वाजता? काय आहे स्टोरी?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement