Orry summoned by Mumbai Police: 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ओरी अडणीत, मुंबई पोलिसांकडून समन्स
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Orry summoned by Mumbai Police: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवात्रामणी ऊर्फ 'ओरी' (Orry) एका गंभीर प्रकरणात अडकला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला तब्बल २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणात समन्स बजावले आहे.
मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमध्ये आणि सोशल मीडियावरील आलिशान लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत असणारा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवात्रामणी ऊर्फ 'ओरी' (Orry) एका गंभीर प्रकरणात अडकला आहे. मुंबई पोलिसांनी त्याला तब्बल २५२ कोटी रुपयांच्या ड्रग्ज सिंडिकेट प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले असून ही बातमी बाहेर येताच मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका गुन्हा काय आहे?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओरीला हा समन्स मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पाठवला आहे. २८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत, २१.८ किलोग्राम मेफेड्रोन नावाचे ड्रग्ज जप्त केले होते, ज्याची किंमत सुमारे २५२ कोटी रुपये होती. या हाय-प्रोफाइल ड्रग्ज रॅकेटचा तपास मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला. याच तपासाचा भाग म्हणून ओरीला बोलावले आहे.
advertisement
ओरीला साक्षीदार म्हणून बोलावले
पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, ओरीला या प्रकरणात केवळ साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ओरीकडे या ड्रग्ज रॅकेटशी संबंधित काही महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला त्याचा जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
advertisement
Social media influencer Orry (Orhan Awatramani) has been summoned by the Mumbai Police in connection with the Rs 252-crore drugs case. He has been asked to appear before the Anti-Narcotics Cell’s Ghatkopar unit tomorrow at 10 AM for questioning: Mumbai Police
— ANI (@ANI) November 19, 2025
advertisement
ओरी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी किड्स आणि बड्या उद्योगपतींच्या मुला-मुलींसोबत पार्टी करताना दिसतो. त्यामुळे, या ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या लोकांशी त्याचे कोणते कनेक्शन होते किंवा त्याला याबद्दल काही माहिती आहे का, याबाबत पोलीस चौकशी करू शकतात.
एअर इंडियाचा माजी पायलटही अटकेत
या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत एकूण सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. या अटकेमध्ये एअर इंडियाचा एक माजी पायलट देखील सामील आहे. DRI ने मुंबईतील एका गोदामातून हे २१.८२ किलोग्राम ड्रग्ज जप्त केले होते. ओरीने या प्रकरणात चौकशीसाठी कधी हजर राहावे, हे त्याला मिळालेल्या समन्समध्ये नमूद करण्यात आले आहे. ओरीच्या या चौकशीमुळे ड्रग्ज सिंडिकेटबद्दल आणखी कोणते मोठे खुलासे होतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2025 11:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Orry summoned by Mumbai Police: 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ओरी अडणीत, मुंबई पोलिसांकडून समन्स


