लग्नाला 3 दिवस झाले तोच सूरज चव्हाणला व्हायचंय बाबा, फक्त एक नको, सांगितलं किती मुलं हवी?

Last Updated:

Suraj Chavan : सूरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. लग्नानंतर सूरजने आपल्याला दोन मुलं हवी असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.

News18
News18
Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा विजेता 'गुलिगत किंग' सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. हजारो चाहत्यांच्या उपस्थित त्यांनी लग्न केलं. सूरजच्या लग्नाची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती. अखेर 29 नोव्हेंबर 2025 रोजी पुण्यातील सासवड याठिकाणी सूरज बोहल्यावर चढला. लग्नानंतर चार दिवसांतच पूजेदरम्यान सूरजने आपल्याला दोन मुलं हवी असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. सूरज चव्हाण लग्नासाठी खूप आतुर होता. 'बिग बॉस' जिंकल्यानंतर अनेक मुलाखतींमध्ये सूरजने याबाबद्दल भाष्य केलं आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरच्या व्लॉगमध्येही सूरजची लग्नासाठी असलेली घाई पाहायला मिळाली होती. आता सूरजने लग्न करत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सूरज आणि संजनावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान सूरजचा एक व्हिडीओ मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
सूरजचा हा व्हिडीओ व्हायरल
रीलस्टार महेश जगदाळे आपल्या आजीला घेऊन सूरजच्या घरी गेला होता. त्यावेळी आई आणि सूरजमधील संवादाने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. व्हिडीओच्या सुरुवातीला सूरज आजीला आपल्या हातावरील मेहंदी दाखवताना दिसत आहे. त्यावर आजी म्हणतेय,"आता काय करायचं? कशाला काढलीस?. त्यानंतर महेश संजनाच्या हातावरील मेहंदी दाखवत म्हणतो,"सूरजचं कसलं प्रेम आहे. पाहिलं का? केवढी मेहंदी रंगली आहे?".
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Mahesh Jagdale (@bindhast_mj)



advertisement
सूरज आणि संजना पुढे आजीच्या पाया पडतात. आजीदेखील तुमचं खूप कल्याण होईल, असं म्हणत नव्या जोडप्याला शुभेच्छा देते. पुढे सूरजची बहिण आजीला लग्नाला का आला नाहीत? असं विचारते. त्यावर आजी म्हणते,"पूजेला यायचं होतं. म्हणून लग्नाला आलो नाही".
सूरजला हवी दोन मुलं
महेश जगदाळे पुढे आजीला सूरजला पहिलं मुलगा व्हायला हवा की मुलगी? असं विचारतो. त्यावर उत्तर देत आजी म्हणते,"पहिलं मुलगा आणि मग मुलगी". पुढे महेश म्हणतो,"सूरज म्हणतोय की त्याला चार मुलं हवी आहेत". त्यानंतर सूरज आणि संजना खूप लाजतात. सूरज आजीला उत्तर देत म्हणतो की "दोन". आजी पुढे म्हणते,"हो. आधी मुलगा आणि मग मुलगी". या व्हिडीओवरुन हे स्पष्ट होतं की सूरजला आता लग्नानंतर दोन मुलं हवी आहेत".
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
लग्नाला 3 दिवस झाले तोच सूरज चव्हाणला व्हायचंय बाबा, फक्त एक नको, सांगितलं किती मुलं हवी?
Next Article
advertisement
Madhuri Dixit On Politics : पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' गर्लने मौन सोडलं
पुण्यातून निवडणुकीची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? अखेर मौन सोड
  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

View All
advertisement